Nashik Crime : नाशकात आढळलेल्या मानवी कवट्या नेमक्या कुणाच्या? समोर आली मोठी अपडेट
Nashik Crime News : पंचवटी परिसरात मानवी कवट्या आणि हाडे आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
नाशिक : पंचवटी (Panchavati) परिसरात मानवी पाच ते सहा कवट्या आणि हाडे आढळले होते. एका गोणीत मानवी हाडे आढळल्याने शहरात (Nashik Crime) एकच खळबळ उडाली होती. एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरातून ही गोणी पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) ताब्यात घेतली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.
या कवट्या आणि हाडे अघोरी विद्या करण्यासाठी आणले असल्याचा पोलिसांना संशय होता. भर वस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यांमुळे चर्चांना उधाण आले होते. पंचवटी पोलिसांच्या तपासात हे मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकच्या असल्याचे समोर आले आहे. गोणीत असलेल्या मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
भोंदू बाबाला अटक
या प्रकरणाचा सूत्रधार कोण याचा शोध पोलिसांकडून सुरु होता. पोलिसांनी एरंडवाडी येथील मंदिराच्या पुजाऱ्याला व इतर नागरिकांना तपासासाठी बोलावून घटनेची चौकशी केली होती. आता या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून इतर चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
खुनाच्या घटनेने नाशिक हादरले
म्हसरुळ पोलीस ठाणे (Mhasrul Police Station) हद्दीत असेलल्या मेरी रासबिहारी लिंकरोडवर (Meri-Rasbihari Link Road) औदुंबर लॉन्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर रिक्षा चालक युवकाची हत्या करण्यात आली आहे. प्रशांत तोडकर (28, रा. रामवाडी) असे या मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या