एक्स्प्लोर

नाशिकमध्ये महिनाभरात सात हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा, दोन कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

Nashik Crime : शहर व ग्रामीण पोलिसांनी महिनाभरात तब्बल  २ कोटी २७ लाख ४४ हजार ६७५ रुपयांचा अवैध मद्यसाठा व गुटखा साठा जप्त केला आहे. तसेच ७ हजार ४६३ टवाळखोर व गुन्हेगारांवर कारवाई केली. 

Nashik Crime News : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर व ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) महिनाभरात तब्बल दोन कोटी 27 लाख 44 हजार 675 रुपयांचा अवैध मद्यसाठा (Illegal liquor) व गुटखा साठा जप्त (Seized) केला आहे. तसेच ७ हजार ४६३ टवाळखोर व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 

लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजताच देशभरात आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली. आचारसंहिता काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले. शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) व ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने (Vikarm Deshmane) यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, अवैध मद्यवाहतूक, गुटखा वाहतूक रोखणे, अंमली पदार्थ विक्री रोखण्यावर भर देण्यात आला.

शहर पोलिसांची कामगिरी 

शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल करीत 34 लाख 36 हजार 573 रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. तसेच 14 कट्टे, 22 काडतुसे, 71 धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच 7 लाख 50 हजार 155 रुपयांची 1 हजार 533 लिटर देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. एमडी प्रकरणी तीन व गांजा प्रकरणी तीन गुन्हे दाखल केले. तसेच 3 हजार 832 टवाळखोर व गुन्हेगारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत व शस्त्रबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. 

ग्रामीण पोलिसांची कामगिरी 

ग्रामीण पोलिसांनी अवैध मद्य विक्री व वाहतूक प्रकरणी 1 हजार 319 गुन्हे दाखल करुन 1 कोटी 29 लाख 12 हजार 907 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. त्याप्रकरणी 1 हजार 233 संशयितांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तसेच अवैध गुटखा प्रकरणी 97 जणांविरोधात 80 गुन्हे दाखल करून 56 लाख 45 हजार 40 रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. तर 3 हजार 631 टवाळखोर, गुन्हेगारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत व शस्त्रबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे. 

100 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई 

सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी तडीपारी, मोक्का, स्थानबद्ध अशा कारवाई केल्या आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी 2 व ग्रामीण पोलिसांनी एका टोळीवर मोक्का कारवाई केली आहे. तर एमपीडीए कायद्यानुसार 10 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तर सुमारे 100 गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

आणखी वाचा 

तीन बोट उलटल्या, डोंबिवलीत आगडोंब, आठवडाभरात 40 जण दगावले, राज्यातील 10 मन हेलावून टाकणाऱ्या दुर्घटना!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget