एक्स्प्लोर

Nashik Accident News: अमेरिकेहून नाशिकला आला, मित्रांसोबत फिरायला गेला अन् काळाने गाठले, 24 वर्षीय शंतनूचा दुर्दैवी अंत

Nashik Accident News: नाशिक-गिरणारे रस्त्यावरील 'गंमतजमंत' हॉटेलजवळील पुलावर झालेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय.

Nashik Accident News: शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेला तरुण दोन वर्षांनंतर मायदेशी परतला, घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, काळाने नियतीचा असा खेळ मांडला की, घरी परतल्याच्या अवघ्या 48 तासांतच या उच्चशिक्षित तरुणाचा भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिक-गिरणारे रस्त्यावरील 'गंमतजमंत' हॉटेलजवळील पुलावर हा अपघात घडला. शंतनू जयंत बुऱ्हाडे (24, रा. दीपज्योती, धनराजनगर, जेलरोड) असे मृताचे नाव आहे. या अपघातात शंतनूचे दोन मित्रही गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Nashik Accident News: नेमकी घटना काय?

शंतनू उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत वास्तव्यास होता. दोन दिवसांपूर्वीच तो नाशिकमध्ये आपल्या घरी परतला होता. शनिवारी (दि. 4) दुपारी 4 वाजेच्या सुमारास तो आपल्या दोन मित्रांसह कारने (MH 46 Z 0067) गंगापूर बॅकवॉटर आणि धरण परिसर फिरण्यासाठी गेला होता. निसर्गाचा आनंद घेऊन रात्री साडेआठच्या सुमारास गिरणारेकडून नाशिककडे परतत असताना, गोदावरी नदीच्या पुलाजवळ असलेल्या 'गंमतजमंत' हॉटेललगत शंतनूचे कारवरील नियंत्रण सुटले.

Nashik Accident News: कारचा चक्काचूर, झाडावर जाऊन आदळली

कारचा वेग जास्त असल्याने ती रस्त्यावर अनेकदा उलटली आणि शेवटी कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये शंतनूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. जखमी मित्रांना स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Nashik Accident News: एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर कोसळले आभाळ

शंतनूचे वडील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये (ISP) कार्यरत आहेत. शंतनू हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून मुलगा मोठा होऊन घरी परतल्याचा आनंद कुटुंबात होता, मात्र अवघ्या काही तासांतच काळाने झडप घातल्याने बुऱ्हाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे जेलरोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik Accident News: नवा 'ब्लॅकस्पॉट' ठरतोय 'गंमतजमंत'चा पूल?

ज्या पुलाजवळ हा अपघात झाला, तिथे गेल्या काही दिवसांत वारंवार भीषण अपघात होत आहेत. वळण आणि अरुंद रस्ता यामुळे हा परिसर आता नवा 'ब्लॅकस्पॉट' म्हणून समोर येत आहे. प्रशासनाने येथे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी वाचा 

Nashik Crime News: अशोक खरात पार्ट 2 'रवींद्र एरंडे'च्या अडचणी वाढल्या, आठ पीडितांची ओळख पटली, चार मोबाईल जप्त; तपासात हादरवणारी माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Palghar And Nashik Earthquake: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget