एक्स्प्लोर

नाशिकमधील तरुणांना रोजगाराची संधी, पाच आकड्यात मानधन; काय आहे 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम?

Mukhyamantri Yojana Doot : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

नाशिक : शासनाच्या (Maharashtra Government) विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojana Doot) उपक्रम सुरु करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) जवळपास 2 हजार 172 उमेदवारांना योजनादूत होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सहा महिन्यांसाठी नियुक्त होणाऱ्या योजनादुताला दरमहा 10 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा रंगली आहे. राज्यातील दलित, महिला, आर्थिक दुर्बल, शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी सरकारतर्फे वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. याच योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क व महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. 

शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी लागणार 

प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक, तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. नाशिक  जिल्ह्यात 1 हजार 383 ग्रामपंचायती आहेत. याशिवाय नाशिक, मालेगाव महानगरपालिका आहे. तसेच मनमाड, येवला, नांदगाव, सटाणा, इगतपुरी, भगूर, त्र्यंबकेश्वर, चांदवड, सिन्नर नगरपरिषदेसह एकूण सहा नगरपंचायती आहेत. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास 2 हजार 172 योजनादूत नियुक्त होण्याची शक्यता आहे. नियुक्त झाल्यानंतर संबंधित योजनादूतांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे.

या आहेत अटी

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वर्षे वयोगटातील पदवीधर, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक असून, संगणक ज्ञान असावे. तसेच उमेदवारांकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे देखील आवश्यक आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.

कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता?

इच्छुक उमेदवाराला मुख्यमंत्री योजनादूत व्हायचे असेल तर त्याला विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही, शिक्क्यासह), वैयक्तिक बँख खात्याचा तपशील, असणे गरजेचे आहे. उमेदवारांना योजनादूतच्या https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शिक्षण फक्त 12, पगार तब्बल 70000! 'या' खात्यात सरकारी नोकर होण्याची संधी; जाणून घ्या A टू Z माहिती

मोठी बातमी!  CV ठेवा तयार, भारतात 'या' क्षेत्रात येणार नोकऱ्यांचा पूर, जाणून घ्या सविस्तर माहिती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 PM 16 September 2024 : ABP MajhaRaj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Ganesh Visarjan 2024 : मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget