एक्स्प्लोर

जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या हत्येचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण

बाळू तुपे हा नाशिकचा पत्रकार होता, विविध विषयांना ते हात घालत होते. पत्रकारिता करताना त्यांनी अशोक खरात विरोधात बातम्या छापल्या होत्या.

मुंबई : राज्यात सध्या नाशिकमधील अशोक खरात (Ashok kharat) प्रकरणावरुन दररोज नवनवे खुलासे होत असून अनेक प्रकरणं समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही गंभीर आरोप केले आहेत. अशोक खरात याला वाचवण्यासाठी 2007 साली पहिला बळी पत्रकार बाळू तुपे याचा देण्यात आला. त्यावेळी या प्रकरणाची नाशिकमध्ये प्रचंड चर्चा होती. वृत्तपत्रातही याबाबत लेख छापून आले होते. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नाही अशातला भाग नव्हता. या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतले, असा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आता, आव्हाड यांच्या आरोपावर बाळू तुपे खून प्रकरणातील आरोपीच्या काकांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बाळू तुपे खून प्रकरण आणि खरातचा संबंध नसल्याचे सनी रोकडे यांनी म्हटलंय.   

बाळू तुपे हा नाशिकचा पत्रकार होता, विविध विषयांना ते हात घालत होते. पत्रकारिता करताना त्यांनी अशोक खरात विरोधात बातम्या छापल्या होत्या. मात्र, त्यानंतर खरातच्या समर्थकांनी बाळू तुपेशी संपर्क साधला होता, त्यांनतर ते प्रकरण मागे पडले होते. मात्र, बाळू तुपे जमिनीच्या व्यवहारात देखील असायचे, काही राजकीय नेत्यांच्या तो संपर्कात होते. बाळू तुपे यांचा खून होण्यामागे होर्डिंग्जचा वाद असल्याचे कारण सांगितले जात होते. तर काहीजण जागेच्या वादाची किनार असल्याचे सांगत आहेत.या प्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल होता मात्र यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. आता, याप्रकरणी खून प्रकरणातील आरोपींच्या काकाने समोर येऊन माहिती दिली आहे. 

बाळू तुपे यांची हत्या केल्याचा आरोप ज्यांच्यावर आहे, त्यातील कुणाल आणि संदिप रोकडे या दोन सख्ख्या भावाचे, आरोपींचे काका सनी रोकडे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. सनी रोकडे हे नाशिकमधील शिवसेना झोपडपट्टी महासंघ महानगर प्रमुख आहेत, त्यांनी संबंधित खून प्रकरणाबाबत माहिती दिली असून खरातने खून केल्याचा दावा फेटाळला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आरोप बिन बुडाचे आहेत. तुपे आणि कुणाल रोकडे यांच्यात वाद झाला होता. त्यातून हाणामारी झाली त्याचे पुढे काय झाले माहिती नाही. रिक्षा चालवणाऱ्या सामान्य कुटुंबातील ही मुले होती, त्याचा आणि खरातचा काही सबंध नाही, असेही सनी रोकडे यांनी सांगितले. दरम्यान, यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपी साधारणपणे दोन वर्षे तुरुंगात होते, ते एकूण 10 आरोपी होते. 

हेही वाचा

VIDEO : रुपाली चाकणकरांनी असंख्य महिलांना अशोक खरातकडे नेलं, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget