एक्स्प्लोर

VIDEO : रुपाली चाकणकरांनी असंख्य महिलांना अशोक खरातकडे नेलं, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा आरोप

Asha Mirge On Rupali Chakankar : महिलांच्या मिटिंगमध्ये अशोक खरात जायचा आणि त्या ठिकाणी चाकणकर त्याची स्तुती करायच्या. त्यामुळे अनेक भोळ्याभाबड्या महिला फसल्या, असा आरोप आशा मिरगे यांनी केला.

मुंबई : अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन जायच्या असा गौप्यस्फोट राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी केला. एबीपी माझाशी बोलताना आशा मिरगे यांनी रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना चाकणकरांची कार्यशैली आणि अशोक खरात याच्यासंबंधी अनेक आरोप केले. 

कुंपणच शेत खाते असं आपण ऐकलं होतं. पण इथं कुंपणच आख्ख शेत लांडग्यापुढे टाकतंय असा प्रकार घडला असा आरोप आशा मिरगे यांनी रुपाली चाकणकरांवर केला. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना कुठल्याही महिलेल्या आपल्या वाटल्या नाहीत, त्यांची उठबस नेहमी मंत्र्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये असायची असं मिरगे म्हणाल्या. 

Asha Mirge On Deepak Kesarkar : केसरकर, चाकणकर या खरातच्या पार्टनर

दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर हे अशोक खरातच्या पार्टनर असल्याचा आरोप आशा मिरगे यांनी केला. त्या म्हणाल्या की, "अशोक खरातसोबत संबंध ठेवणाऱ्यांमध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत. त्यामध्ये त्यांचे काही मित्रदेखील आहेत. काही लोक अशोक खरातचे पार्टनर असून त्यामध्ये दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकरांचा नंबर येतो.

Asha Mirge On Ashok Kharat : महिलांना खरातकडे नेलं

आपल्या आजूबाजूच्या महिलांना आवर्जून अशोक खरातकडे न्यायचं काम रुपाली चाकणकर करायच्या असा थेट आरोप आशा मिरगे यांनी केला. त्या म्हणाल्या की, "महिला संघटनांची मिटिंग असताना त्या मिटिंगला अशोक खरात जायचा. त्या मिटिंगमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातची स्तुती करायच्या. हा माझा पांडूरंग आहे, मी आज जिथे आहे तिथपर्यंत यांच्यामुळे पोहोचले असल्याचा दावा चाकणकर करायच्या. त्यामुळे समोर बसलेल्या भोळ्या भाबड्या महिला फसायच्या. त्या भोळ्या भाबड्या महिलांना अशोक खरातच्या जाळ्यात टाकायच्या.

Ashok Kharat Rupali Chakankar Case : हे प्रकरण समोर कसं आलं? 

आशा मिरगे म्हणाल्या की, "नीरज जाधव हा अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करायचा. त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोला अशोक खरातनं भेटायला बोलावलं. मग त्या नीरज जाधवला संशय आल्यानंतर त्याने अशोक खरातच्या कार्यालयात छुपे कॅमेरे लावले. त्यानंतर या बाबाच्या कार्यालयात जे काही होत होतं त्याचं फुटेज घेऊन तो गायब झाला. तीन महिन्यानंतर त्याने एका एआरटीओ महिलेला गाठलं आणि तिच्याकडून पैशाची मागणी केली."

आशा मिरगे पुढे म्हणाल्या की, " हे समोर येताच त्या महिलेला धक्का बसला. कारण असं काही झालं असेल हे तिला समजलं. अशोक खरातने तिला काहीतरी प्यायला दिलं आणि त्यामुळे तिला गुंगी आली. त्यानंतर हे सगळं झाल्याचं तिला आणि तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं. या प्रकरणी तिने शिर्डी या ठिकाणी नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल केला. ही गोष्ट अशोक खरातपर्यंत पोहोचली. हे प्रकरण अंगलट येणार असल्याचं समजताच त्याने नाशिकमध्ये तक्रार दाखल केली. फोटो मॉर्फ केल्याची तक्रार त्याने केली होती. पण ते फोटो आणि व्हिडीओ खरे असल्याचं पोलिसांना समजलं." 

त्यानंतर अहिल्यानगरमध्ये असलेल्या नीरज जाधवचा मोबाईल तपासल्यानंतर त्याच्याकडे 58 व्हिडीओ असल्याचं समोर आलं. त्याचसोबत त्याच्याकडे अनेक व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असं आशा मिरगे यांनी सांगितलं.

Asha Mirge On Rupali Chakankar : चाकणकरांचा ड्रेसिंग सेन्स, मेक अप

महिला आयोग हा महिलांना विश्वासाचं न वाटण्यामागचं कारण म्हणजे रुपाली चाकणकर होत्या असं आशा मिरगे म्हणाल्या. याच्या आगोदरच्या आयोगांच्या नावावर लक्ष टाकलं असता, एखाद्या महिलेला त्या आपल्या वाटतील असं असायचं. पण रुपाली चाकणकरांचा ड्रेसिंग सेन्स, त्यांचा मेक अप, ग्लॅमर पाहून अनेक महिलांना कॉम्प्लेक्स व्हायचा. या महिलेचा वावर हा सतत मंत्री, अधिकारी यांच्यासोबतचा असायचा. त्या सतत राजकारण करायच्या. त्यामुळे कुणालाही त्या आपल्या वाटल्या नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget