(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवार लढणार नसतील तर माढा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी लढावं, भाजपच्या खासदारचं आव्हान
माढा लोकसभा (Madha loksabha) मतदारसंघातून शरद पवार लढणार नसतील तर सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवावी असं आव्हानं भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलं.
Madha Lok Sabha : माढा लोकसभा (Madha loksabha) मतदारसंघातून शरद पवार लढणार नसतील तर सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवावी असं आव्हानं भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी दिलं आहे. मी मतदारसंघात आहे की नाही किंवा लोकांची कामं केली आहेत की नाहीत हे बघण्यासाठी पवारसाहेबांनी किंवा सुप्रिया सुळेंनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी. त्यानंतर त्यांना माढ्यात विकासकामं झाली की नाही हे कळेल असे निंबाळकर म्हणाले.
शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी, माझं त्यांना जाहीर आव्हान असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. मला सध्या आव्हान नाही. त्यामुळं नवीन कोणाचं चांगल आव्हानं येतेय का ते मी बघत असल्याचे निंबाळकर म्हणाले. प्रत्येकाची इच्छा असते की आमदार व्हावं खासदार व्हावं त्यामध्ये चुकीचं असण्याचे कारण नाही. मी काय कायमस्वरुपी या लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून शिक्का मारला नाही असे निंबाळकर म्हणाले.
पक्ष ज्याला कोणाला संधी देईल त्याचे काम करणार
पक्षाला जर वाटलं की हा माणूस काम करतोय तर पक्ष मला पुन्हा संधी देईल. नाहीतर पक्ष ज्याला कोणाला संधी देईल त्याचे काम आम्हाला सर्वांनी ताकदीनं करावं लागेल असे निंबाळकर म्हणाले. मी मतदारसंघात कामे करत असतो. मी लोकसभेत किती बोललो आणि किती कामे पूर्ण केली याची माहिती सुप्रिया सुळे यांनी घ्यावी असे निंबाळकर म्हणाले.
अमित शाह यांच्यामुळं शरद पवारांची पार्टी नॅनो झाली
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यामुळं शरदपवार यांची पार्टी नॅनो झाली असल्याचे खासदार निंबाळकर म्हणाले. त्यांच्या नेतृत्वामुळें राष्ट्रवादी नॅनो पार्टी झालीय. मोहिते पाटील आणि निंबाळकर वादावर बोलताना प्रत्येक जण इच्छुक असतात. तिकीट देण्याचा अधिकार पक्षाचा असतो. जो तो तिकीट मागत असतो. आता पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचे काम सर्वांनाच जोमानं करावं लागेल असे खासदार निंबाळकर म्हणाले.
मी बोलण्यापेक्षा काम करतो
मला मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. माझ्या आधीच्या काळात शरद पवार हे देखील माढा मतदारसंघाचे खासदार होते. ते किती वेळा मतदारसंघात आले हे सुप्रिया सुळेंनी सांगावे असे खासदार निबांळकर म्हणाले. लोकसभेत मी बोललो आहे. लोकांचे प्रश्न मांडले आहेत. मी बोलण्यापेक्षा काम केले आहे. सुप्रिया सुळेंच्या वडीलांपेक्षा जास्त माढा मतदारसंघात मी काम केल्याचे खासदार निंबाळकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: