एक्स्प्लोर

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

Raj Thackeray on Missing Link: देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेतील भाषणात मिसिंग लिंकवरुन राजकारण करु नका असे सांगितले. वा रे वा, त्याचं राजकारण करु नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण, आपण इतकी वर्षे विरोधात असताना काय करत होतात, दुसऱ्यांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? आता स्वत:च्या अंगाशी  आल्यावर विरोधक राजकारण करतात, असे तुम्ही बोलताय, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ते गुरुवारी मुंबईतील मनसे (MNS) रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी मिसिंग लिंकच्या (Connecting link) दुर्घटनेवरुन राजकारण करुन महाराष्ट्राचा अपमान करु नका, असे बोलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा समाचार घेतला. (Maharashtra Politics)

मुख्यमंत्री विधानसभेत काय बोलतात,'एकवेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही. लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? पण केंद्र सरकारविरोधात काही बोललं तर देशविरोधी ठरवलं जातं, मिसिंग लिंकबद्दल (Missing link) बोललं तर महाराष्ट्राचा अपमान होतो. मग लोकांनी तुम्हाला प्रश्नच विचारायचे नाहीत का, असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. आता सरकारला ज्या शिव्या घातल्या आहेत, ते गेली अनेक वर्षे तुमच्याकडूनच सुरु होते. विरोधकांना वाटेल ते बोल, शिव्या घाल, हे तुमच्याकडूनच सुरु होते. आता या गोष्टी अंगलट येऊ लागल्यावर  आणि सगळं अंगावर आल्यावर तुम्हाला त्रास होऊ लागला आहे. पण या सगळ्या गोष्टी आपणच सुरु केल्या होत्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की, मिसिंग लिंक उत्तम दर्जाचे बांधकाम आहे. यावरुन राजकारण करणाऱ्यांना बघून घेऊ. अरे तू मुख्यमंत्री आहेस ना, बघून घेऊ काय? हे सगळे बोलल्यानंतर मुख्यमंत्री अचानक हिंदीतून बोलायला लागले. ते कोणासाठी हिंदीत बोलत होते, समोरचे आमदार मराठी, विधानसभा महाराष्ट्राची आणि आमचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. हे कशासाठी आणि कोणासाठी होतं? कदाचित देवेंद्र फडणवीस यांना आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल, तुम्हाला बघून घेईन. त्यांनाही माहिती आहे, हे सगळे व्हिडीओ कुठून येत आहेत? भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर घमासान सुरु आहे, फक्त पाहत राहा आगामी काळात काय होते?, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Diwali 2026 Shubh Yog: यंदा 5 राशींची दिवाळी जोरात, तब्बल 100 वर्षांनी जुळतोय पॉवरफुल 'पुष्य नक्षत्र योग'! सलग 2 दिवस धनलाभाचे संकेत, ज्योतिषशास्त्र....
यंदा 5 राशींची दिवाळी जोरात, तब्बल 100 वर्षांनी जुळतोय पॉवरफुल 'पुष्य नक्षत्र योग'! सलग 2 दिवस धनलाभाचे संकेत, ज्योतिषशास्त्र....
Gondia News: वाघांच्या भ्रमणमार्गात वीजवाहिनीचा घाट; तब्बल 5,152 झाडांवर कुऱ्हाड! वन्यजीवप्रेमींसह शेतकऱ्यांचा आक्षेप, रायपूर ते तिरोडापर्यंतच्या वीजवाहिनीवरून संघर्षाची चिन्ह
वाघांच्या भ्रमणमार्गात वीजवाहिनीचा घाट; तब्बल 5,152 झाडांवर कुऱ्हाड! वन्यजीवप्रेमींसह शेतकऱ्यांचा आक्षेप, रायपूर ते गोंदियाच्या तिरोडापर्यंतच्या वीजवाहिनीवरून संघर्षाची चिन्ह
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget