एक्स्प्लोर

शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये मटणाचं जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या चांगलंच जीवावर बेतलं आहे.

नाशिक : मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर, गेल्या महिन्यात 28 जून रोजी नाशिक जिल्ह्याच्या बागलाणातील आखतवाडे (Nashik) येथे एका शेतकरी दाम्पत्यानी रात्री चिकन आणि दही खाल्ल्यानंतर थोड्यावेळाने दाम्पत्याची अचानक प्रकृती (Hospital) बिघडल्याची घटना घडली. या घटनेत उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू झाला होता, आता 10 दिवसानंतर पतीचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे, या विषबाधा प्रकरणाचे गुढ आणखी वाढले असून दोघांच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.  
 
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये मटणाचं जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या चांगलंच जीवावर बेतलं आहे. रविवार 28 जून रोजी रात्री चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्यांचे पती शांताराम यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मालेगाव येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे, या दाम्पत्याच्या मृत्यूचं कारण शोधून काढणे जिल्हा वैद्यकीय प्रशासनापुढे आव्हान बनलं आहे. 

अन्न व औषध प्रशासना विभागाचे पथक पोहोचले

दरम्यान, या घटनेनंतर सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथे अन्न व औषध प्रशासनाची (FDA) टीम दाखल झाली होती. टीमकडून संबंधित ठिकाणावरील विविध खाद्यपदार्थांचे नमुने (सॅम्पल) संकलितही करण्यात आले होते. मात्र, अद्यापही या विषबाधासंदर्भातील अहवाल समोर आलेला नाही. चिकनमुळे विषबाधा झाली की इतर कोणत्या खाद्यपदार्थामुळे, याचा तपास सुरु करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती, अन्न तयार करण्याची प्रक्रिया आणि वापरलेल्या साहित्याची माहिती प्रशासनाकडून पडताळली जात आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

वैद्यकीय तज्ज्ञाच्या मतं विषबाधा

दरम्यान, या विषबाधेच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती, नेमकी विषबाधा चिकनमुळे झाली की दह्यामुळे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अनेकदा मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने किंवा अन्न शिळे असल्यास फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. मात्र, या प्रकरणातील नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, 10 दिवसांनी आता त्यांच्या पतीचा देखील मृत्यू झाला. 

हेही वाचा

केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Nashik Crime News: भावली धरणावर छेडछाड अन् राडा, चारवेळा जीवघेणा हल्ला, इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीला लटकून हल्ला करणारा गुंड शेवटी हायवेवरच धाडकन पडला
भावली धरणावर छेडछाड अन् राडा, चारवेळा जीवघेणा हल्ला, इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीला लटकून हल्ला करणारा गुंड शेवटी हायवेवरच धाडकन पडला
Govindgiri Maharaj : उद्धव ठाकरेंना रामरक्षा शब्द आठवला, हि ईश्वराची कृपा; त्यांनी रामरक्षा नीट बोलून दाखवावी मग आम्ही ही...; गोविंदगिरी महाराजांच थेट आव्हान
उद्धव ठाकरेंना रामरक्षा शब्द आठवला, हि ईश्वराची कृपा; त्यांनी रामरक्षा नीट बोलून दाखवावी मग आम्ही ही...; गोविंदगिरी महाराजांच थेट आव्हान
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
Embed widget