एक्स्प्लोर
Advertisement
मालेगावात तरुणांमध्ये कुत्ता गोळीची झिंग! नाशिक पोलिसांनी केली जबरदस्त कामगिरी - काय आहे नेमकी ही कुत्ता गोळी...
नाशिक शहरासह (Nashik City News) मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीय.
Nashik Malegaon News: नाशिक शहरासह (Nashik City News) मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. काही दिवसांपूर्वी मालेगाव शहराचे कुत्ता गोळीचे कनेक्शन दोन मोठ्या शहराशी जोडण्यात आले होते. आता पुन्हा मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे पेव फुटले आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये पोलीस ठाणे निहाय कारवाया सुरू आहेत. त्याअनुषंगाने मालेगाव शहरात गुंगीकारक औषधी गोळ्यांची अवैधरित्या विक्री होत असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणेतील पोलीस अंमलदारांच्या मदतीने 06 डिसेंबर रोजी मालेगाव शहरातील न्यू मदनीनगर भागात अवैधरित्या औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या रईस शहार उर्फ शहा याच्यावर छापा टाकून त्याच्या कब्जातून गुंगीकारक औषधी गोळ्यांच्या 10 हजार 80 रुपयांच्या 280 स्ट्रीपचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संबंधित संशयित हा त्याचा फरार साथीदार मुज्जमील याच्यासह मालेगाव शहरात विनापरवाना वैद्यकिय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान नसतांना शरीरावर परिणाम करणा-या गुंगीकारक औषधी गोळयांची विक्री करताना आढळून आले. संशयितांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात रईस शहार उर्फ शहा मालेगाव यास अटक करण्यात आली असून पुढील तपास आझादनगर पोलीस ठाण्याचे पोउनि तागड हे करीत आहेत.
तसेच मालेगाव शहरातील नामपुर रोड- गोविंदनगर, चंदनपुरी रोड-पवारवाडी तसेच मनमाड शहरातील सुभाष रोड परिसरात अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. यावरून विशेष पथकाने छापे टाकून कारवाई केली आहे. सदर कारवाईत मालेगाव शहरातील संशयित प्रविण भालचंद्र नेरकर, खलील अहमद मोहम्मद इसाक तसेच मनमाड येथील जमीरखान उस्मानखान पठाण यांच्यावर छापे टाकून त्यांचे कब्जातून किंमती 70 हजार 600 रुपये किंमतीचा अवैध गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून सदर संशयितांविरुद्ध मालेगाव कॅम्प, पवारवाडी व मनमाड पोलीस ठाण्यात 03 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
संपर्क करण्याचे आवाहन...
नाशिक जिल्हयात अवैधरित्या सुरू असलेल्या व्यावसायांविषयी नागरीकांना काही माहिती द्यावयाची असल्यास नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे हेल्पलाईन क्रमांक 6262256363 यावर संपर्क साधावा व आपल्या परिसरातील गोपनीय व्यवसायांची माहिती दयावी, माहिती देणा-यास त्याचे नाव विचारले जाणार नाही व त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे.
तरुण कुत्ता गोळीच्या आहारी
गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये कुत्ता गोळीचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले आहे. त्याबाबत पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई देखील केली जात आहे. मात्र तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असल्याने मुस्लिम संघटना आणि मालेगाव पोलीसांनी याबाबत जनजागृती करत कुत्ता गोळीपासून दूर राहा याबाबत आवाहन केलं जात आहे. मात्र, दारूची नशा महागडी वाटत असल्याने अवघ्या काही पैशात रुपयांना मिळणारी कुत्ता गोळी नशेसाठी सोपी असल्याने तरुणाई आहारी जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement