एक्स्प्लोर

Nashik News : "नायलॉन मांजा विक्री कराल तर याद राखा"; नाशिक पोलीस आयुक्तांचा कडक इशारा

Nashik Police : नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री व वापरावर दि.२३ जानेवारीपर्यंत मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Nashik News : मकर संक्रांत (Makar Sankranti 2024) म्हटली की, पतंग (Kite) उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगासोबत लागणारा नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो. नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Nashik City Police Commissioner Sandeep Karnik) यांनी नायलॉन मांजा (Nylon Manja) वापरावर बंदी घातली आहे.

मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा हा नायलॉन आणि काचेच्या कोटिंगचा असतो. यामुळे पक्षी, प्राणी, नागरिक अनेकदा जखमी होतात. नाशिक शहरामध्ये पतंगाच्या मांजामुळे गेल्या काही दिवसांत दुचाकीस्वार व सायकलवरील विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर काही जणांचा मंजामुळे मृत्यूदेखील झाला आहे. 

पर्यावरणाच्या दृष्टीने घातक (Nylon Manja is environmentally harmful)

तसेच नायलॉन मांजामुळे विजेच्या तारांचे घर्शन होऊन आग लागून वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकारही घडतात.घरातील इलेक्ट्रिक उपकरणांनाही बाधा पोहोचते. नायलॉन मांजाचा वापर हा पर्यावरणाच्या दृष्टीने देखील घातक आहे. नायलॉन मांजा लवकर तुटत नाही. तसेच त्याचा नाशही होत नाही.

मांजाची निर्मिती, विक्री, खरेदी, वापरावर प्रतिबंध

त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील नागरिकांचे जीविताचे संरक्षण व्हावे तसेच नायलॉन मांजाच्या वापरामुळे अपघात प्रमाणास  प्रतिबंध व्हावा. यासाठी तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरिता नायलॉन मांजावर व ज्या मांजावर काचेचे धारदार व टोकदार कोटिंग केलेले आहे, अशा मांजाची निर्मिती, विक्री खरेदी व वापर आदींवर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिल्याची माहिती नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे.

...तर होणार कारवाई

नाशिक पोलिसांनी (Nashik Police) दि.२३ जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा विक्री व वापरावर मनाई केली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. तसेच गुन्हा दाखल केल्यानंतरही मांजाचा वापर व विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास तडीपार, हद्दपार व इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आणखी वाचा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटीप्रकरणी शुभम खैरनार, मग धनंजय लोखंडेला अटक; आता पुण्यातील महिलेलाही घेतलं ताब्यात, मोबाईल, लॅपलॉप उघडताच हादरवणारी माहिती
NEET पेपरफुटीप्रकरणी शुभम खैरनार, मग धनंजय लोखंडेला अटक; आता पुण्यातील महिलेलाही घेतलं ताब्यात, मोबाईल, लॅपलॉप उघडताच हादरवणारी माहिती
Imtiaz Jaleel : एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवरील कारवाईवरून इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, न्यायाधिशांना हे मान्य आहे का?
एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवरील कारवाईवरून इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, न्यायाधिशांना हे मान्य आहे का?
NEET Paper Leak Case : नाशिकमधील शुभम आणि पुण्यातील धनंजयने NEET चा पेपर फोडला; किती रुपयांना विकला?, धक्कादायक महिती समोर
नाशिकमधील शुभम आणि पुण्यातील धनंजयने NEET चा पेपर फोडला; किती रुपयांना विकला?, धक्कादायक महिती समोर

व्हिडीओ

Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report
Shahzad Bhatti Special Report : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई
Rohit Pawar Comments On Baramati : रोहित पवार बारामतीत जास्त लक्ष घालतायत? | Special Report
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update : पुढच्या दोन दिवसात गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती, अंदमान-निकोबारमध्ये पाऊसधारा कोसळणार
पुढच्या दोन दिवसात गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती, अंदमान-निकोबारमध्ये पाऊसधारा कोसळणार
Thalapathy Vijay : NEET हा प्रकारच कायमचा रद्द करा, तामिळनाडूचा त्याला विरोध; थलापती विजय यांचा केंद्रावर निशाणा
NEET हा प्रकारच कायमचा रद्द करा, तामिळनाडूचा त्याला विरोध; थलापती विजय यांचा केंद्रावर निशाणा
GST : राज्यातील 29 महापालिकांना GST भरपाईपोटी 5,585 कोटींचा निधी; मुंबई महापालिकेला सर्वाधिक 2,587 कोटी
GST : राज्यातील 29 महापालिकांना GST भरपाईपोटी 5,585 कोटींचा निधी; मुंबई महापालिकेला सर्वाधिक 2,587 कोटी
NEET UG ची फी कुणाला परत मिळणार, पैसे विद्यार्थ्यांच्या की नेट कॅफे चालकांच्या खात्यात ? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
NEET UG ची फी कुणाला परत मिळणार, पैसे विद्यार्थ्यांच्या की नेट कॅफे चालकांच्या खात्यात ? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
MPSC :  एमपीएससीचा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द
MPSC चा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द
'आर्ट ऑफ लिव्हिंग' आंतरराष्ट्रीय केंद्रात 1 लाखांहून अधिक अनुयायी; सेवा, शांतता आणि मानवतेचा जागतिक सोहळा
'आर्ट ऑफ लिव्हिंग' आंतरराष्ट्रीय केंद्रात 1 लाखांहून अधिक अनुयायी; सेवा, शांतता आणि मानवतेचा जागतिक सोहळा
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत सीबीआयच्या कारवाया गतीमान; महिलेनंतर पुण्यातून एका विद्यार्थ्याला अटक
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत सीबीआयच्या कारवाया गतीमान; महिलेनंतर पुण्यातून एका विद्यार्थ्याला अटक
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
Embed widget