एक्स्प्लोर

Nashik Advay Hiray : मालेगावमध्ये पुन्हा एकदा भुसे आणि हिरे यांच्यात सामना, कोण आहेत अद्वय हिरे?

Nashik Advay Hiray : अद्वय हिरे यांनी शिवबंधन हाती बांधून मालेगावच्या मैदानात नव्या इनिंगला सुरवात केली आहे.

Nashik Advay Hiray : शिंदे गटाने ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक दणके दिल्यानंतर ठाकरे गटानेही पलटवार केला आहे.  थेट जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याच समोर आव्हान उभं करण्याची रणनीती आखली आहे. भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानं मालेगावमध्ये (Malegaon) पुन्हा एकदा भुसे आणि हिरे यांच्यातील सामना रंगणार आहे.

नाशिक (Nashik) जिल्हा आणि महाराष्ट्राला हिरे कुटूंबीय नवीन नाही. भाऊसाहेब हिरे यांच्यापासून प्रशांत दादा हिरे अशा सर्वांचीच राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकरणात आपला दबदबा कायम राखला. आता हिरे कुटूंबातील पुढची पिढी भाजपचे युवा नेतृत्व भाजपचे अद्वय हिरे (Advay Hiray) शिवबंधन हाती बांधून मालेगावच्या मैदानात नव्या इनिंगला सुरवात केली आहे. ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्याच्या रांगा लागल्या असताना ठाकरे गटात भाजपमधून प्रवेश होत असल्यानं नेत्याची छाती अधिकच फुलली आहे. संजय राऊत (sanjay Raut) यांच्या मागील नाशिक (Nashik) दौऱ्यात अद्वय हिरे यांनी त्यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली होती, त्यानंतर आज प्रवेशाचा दिवस उजाडला आहे. 

2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या प्रशांत हिरे यांचा दादा भुसे (Dada Bhuse) या नवख्या उमेदवाराने पराभव करून हिरेंच्या साम्राज्यला सुरुंग लावला. पुन्हा 2009 मध्येही आधीचा दाभाडी आणि आताच्या मालेगाव बाह्य मतदारसंघात दादा भुसेंनी विजय संपादित करून आजपर्यंत शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला. दरम्यानच्या काळात जनराज्य आघाडी नावाचा पक्ष अपूर्व हिरे यांनी सुरु करून महापालिका निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर नाशिक शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर आमदार झाले. मात्र 2014 नंतर अचानक हिरे कुटुंबियांना भाजप मुख्यत्वे मोदी करिष्म्याचा साक्षात्कार झाला.. अपूर्व आणि अद्वय या दोन्ही बंधूनी कमळ हाती घेऊन आपली कारकीर्द सुरु केली. 

2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढली. मात्र भाजपच्या सीमा हिरेंनी त्यांचा पराभव केला. तेव्हाही अद्वय हिरे भाजपमध्येच राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अद्वय यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. मात्र शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यानं दादा भुसे यांच्याशी जमवून काम कसं करणार? दादा भुसे आमदार असताना आपल्याला पुन्हा मालेगाव बाह्य मधून निवडणूक लढण्याची संधी मिळणार का असे प्रश्न निर्माण झाल्यानं राजकीय अवकाश शोधत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करून एक वर्तुळ पूर्ण केले. मध्यंतरीच्या काळात भाजपमध्ये असूनही त्यांनी दादा भुसे यांच्या विरोधात आंदोलन करत भविष्यात काय घडणार याची चुणूक दाखवून दिली होती. 

दरम्यान नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघ, शिक्षण संस्था,  कृषी उत्पन्न बाजार समिती अशा वेगवगेळ्या क्षेत्रात नेतृत्व केलेला हा हिरा आता ठाकरे गटाच्या गळाला लागला आहे.. हिरे कुटुंबाचा इतिहास, शिक्षण संस्थांची ताकद आणि विविध सामाजिक उपक्रमात असणारा पुढाकार दादा भूसेंसारख्या मुरब्बी राजकारण्याविरोधात काय रणनीती आखणार त्यांच्या वाटेत किती आव्हाने उभे करणार हे यावरच अद्वय हिरे यांची पुढची राजकीय वाटचाल आणि ठाकरे गटाचे मालेगावमधील भवितव्य अवलंबूबन आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget