Nashik News : 'नो युवर आर्मी' नाशिकमध्ये सजली युद्धभूमी, भारतीय लष्कराचं सामर्थ्य शस्त्रास्त्र प्रदर्शनातून!
Nashik News : आर्टिलरी सेंटर देवळाली (Artillery Center Deolali) यांच्या वतीने नाशिक (Nashik) शहरातील सिटी सेंटर मॉल येथे सैन्य शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
Nashik News : यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या (Independance Day) पार्श्वभूमीवर होत असलेल्या आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Amrut Mahotsav) युनायटेड वि स्टँड फाउंडेशन, सिटी सेंटर मॉल आणि आर्टिलरी सेंटर देवळाली (Artilary Center Deolali) यांच्या वतीने नाशिक (Nashik) शहरातील सिटी सेंटर मॉल येथे सैन्य शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नाशिकरांना उत्तम प्रतिसाद देत असून युद्धात वापरल्या जाणाऱ्या शस्रांची माहिती या माध्यमातून दिली जात आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारतीय सैन्य दल सिटी सेंटर मॉल आणि युनायटेड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'नो यूआर आर्मी' उपक्रमांतर्गत सैन्य दलातील विविध शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याबाबतची माहिती मॉलच्या मार्केटिंग व्यवस्थापक सुप्रिया आरोळे यांनी दिली. सैन्यदलाचे अधिकारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार पोलीस आयुक्त जयंत नवरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होऊन नाशिककरांसाठी सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. तसेच प्रत्येक शस्त्रांची माहिती सैन्य दलातील अधिकारी उपस्थित असणार उपस्थित असून त्यांच्याकडून शस्त्रांची इंत्यभूत माहिती दिली जात आहे.
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिककरांना भारतीय सैन्यदनातील 120 मोटार गण 122 एमएम गण रॉकेट लॉन्चर डीजीडोग्राफी यासह अन्य शस्त्रास्त्रे पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे नाशिकच्या सिडको परिसरातील सिटी सेंटर मॉल परिसरात येथे या भव्य शस्त्रांचे प्रदर्शन मानण्यात आले आहे. नाशिककरांना आज पासून ते 16 ऑगस्ट पर्यंत या कालावधीत ही शस्त्रांचा प्रदर्शन पाहता येणार आहे. नाशिक महानगरपालिका, आर्टिलरी सेंटर, युनायटेड वुई स्टॅण्ड फाऊंडेशन आणि सिटी सेंटर मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने युद्धात वापरल्या गेलेल्या आणि वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांचं म्हणजे तोफा आणि दारूगोळा, विविध प्रकारच्या रायफल आणि बंदुकाचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. शहरातील सिटी सेंटर मॉल इथं 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं राहणार आहे.
आर्मी सिम्फनी बॅण्डचे खास आकर्षण
याचबरोबर या प्रदर्शनात आर्मी सिम्फनी बॅण्डचे खास आकर्षण असणार आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास आर्मी सिम्पनी बँक सादरीकरण करण्यात येणार आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिककर यांनी यावे असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे. भारतीय लष्कराचं सामर्थ्य या शस्त्रास्त्र प्रदर्शनातून दिसून येत आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी मिलिटरी बँण्डचे वादन करण्यात येणार आहे.
वॉरियर्स पोस्टर्सचे प्रदर्शन
विभाजन विभिषिका शोकांतिका स्मृती दिननिमित्ताने सिटी सेंटर मॉल येथे स्वातंत्र्य पूर्व फाळणी वेळचे प्रसंग आणि घटना दर्शविणारे छायाचित्र आणि माहिती प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले. याच प्रकारचे प्रदर्शन पिनॅकल मॉल येथेही भरवण्यात आले आहे. उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर यांच्या हस्ते पिनॅकल मॉल येथील छायाचित्र प्रदर्शनाचं उदघाटन करण्यात आले.