एक्स्प्लोर

Nashik NMC Teachers : नाशिक मनपाच्या शिक्षकांना तीन महिन्यापासून वेतन नाही, शिक्षक आंदोलनाच्या पावित्र्यात

Nashik NMC Teachers : नाशिक (Nashik) महानगरपालिकाच्या शिक्षकांना (Teachers) मागील 3 महिन्यापासून वेतन नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Nashik NMC Teachers : एकीकडे शिक्षकांच्या (Teachers) मुख्यालयी राहण्याबाबतचा मुद्दा चांगलाच गाजवीत असता नाशिकच्या (Nashik) मनपा शिक्षकांबाबत (NMC Teachers) महत्वाची माहिती समोर येत आहे. नाशिक महानगरपालिकाच्या शिक्षकांना मागील 3 महिन्यापासून वेतन नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांकडून (Teachers Protest) आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

नाशिक मनपाच्या (Nashik NMC) शहर परिसरात सातशेहून अधिक शाळा आहेत. कोरोना काळात (Corona) ऑनलाईन शिकवणी बंद झाल्याने सध्या सर्व शाळा सुरळीत सुरु आहेत. असे असताना मात्र येथील शिक्षकांना तब्बल तीन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. नाशिक महापालिकेच्या शाळांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वेतन अनुदानासाठीचा शासन हिस्सा लालफितीच्या फाइलमध्ये अडकल्याने गेल्या तीन महिन्यांपासून या शिक्षकांचे वेतन रखडले आहे. ही आर्थिक घुसमट सहन करण्याच्या पलिकडे गेल्याने शिक्षक संघटनांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने 950 हुन अधिक प्राथमिक शिक्षकाचे वेतन रखडले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मनपा शिक्षकांना 50 टक्के मनपा, 50 टक्के शासनाकडून अनुदान दिले जाते. यात सध्या मनपाचे देयक तयार आहे मात्र शासनाकडून अनुदान नसल्याने वेतन रखडले आहे. या पार्श्वभूमीवर मनपा शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या १२ सप्टेंबर ला शिक्षण उपसंचालक कार्यलयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात मनपा शिक्षकांसह निवृत्ती वेतन थकलेले निवृत्त शिक्षक ही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे यांनी दिली. 

ऑगस्ट महिन्यातही निवेदन 
दरम्यान शिक्षक संघटनकडून यापूर्वी देखील निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांची भेट घेत वेतन अनुदानाचा शासन हिस्सा न मिळाल्याने शिक्षकांचे वेतन रखडल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या बैठकीत समाधानकारक माहिती न मिळाल्याने समितीने 02 सप्टेंबरचा अल्टिमेटम शिक्षण विभागाला दिला होता, मात्र त्यानंतर देखील काही साध्य झाले नसल्याचे समोर आले. त्यामुळे आता  येत्या 12 सप्टेंबरला शिक्षण उपसंचालक कार्यलयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार आहेत.

शाळा डिजिटल करण्यावर भर 
एकीकडे मनपा शिक्षकांना वेतन मिळत नसल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे मनपाच्या शाळा डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. सोयीसुविधांनी युक्त शाळा विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावेल, त्यातून गळती थांबण्यास मदत होईल. या दृष्टीने यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. असे असताना याच शाळातील शिक्षकांना मागील तीन महिन्यापासून पगार नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकडे शासनांसह संबंधित प्रशासनने लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , या अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीकाVijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीकाKho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , या अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Embed widget