एक्स्प्लोर

Nashik Crime : धूमस्टाईल पाठलाग! सुरगाण्यात पुष्पा पॅटर्न तस्करीचा डाव उधळला, दोघे संशयित ताब्यात

Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) सुरगाणा तालुक्यातील (Surgana) बोरपाडा खैर लाकडाची अवैध वाहतूक (Illegals Transport) करणाऱ्या तस्करांच्या (Smuggler) मुसक्या आवळण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले आहे. 

Nashik Crime : त्र्यंबक (Trimbakeshwer) तालुक्यातील जंगल परिसर असलेला हरसूल (Harsul), पेठ, सुरगाणा तालुक्यातील काही भागातून सर्रास खैर लाकडाची तस्करी केली जाते. काही दिवसांपूर्वी पेठ, वांगणी, हरसूल शिवारात खैर लाकडाची तस्करी रोखली असताना आता बोरपाडा खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले आहे. 

नाशिकच्या (Nashik) पश्चिम पट्ट्यातील हरसूल, वाघेरा पेठ-सुरगाणा तालुक्यातील काही भाग आदी परिसर जंगलाने व्याप्त असल्याने लाकूड तस्करीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. दरम्यान वन पथक धडक कारवाई करत असल्याने काही अंशी गायब झालेली खैर लाकूड तस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार साताराचा खैराची तस्करी गुजरात सेमी जवळील जंगलात रोखण्यात यश आले आहे. 

सुरगाणा, पेठ या भागात मुसळधार पावसाने आठवडापासून विश्रांती घेतली आहे. यामुळे खैर तस्कराची टोळी  पुन्हा एकदा या भागात सक्रिय होऊ लागली आहे. बाऱ्हे वनपरिक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचत खैराची पळसन वनक्षेत्रातील बोरपाडा येथे खैर लाकडाची तस्करी रोखण्यात यश आले आहे. पिकअप वाहनातून खैराचे वीस नग घनमीटर 0.907 वन कर्मचाऱ्यांनी हस्तगत केले. पळसन वनपरिक्षेत्रातील बोरपाडा वन परिमंडळ अंतर्गत असलेल्या भागातून एका पिकप गाडीतून काही संशयीत व्यक्ती खैराची लाकडे अवैधरित्या वाहून नेणार असल्याची गोपनीय माहिती पळसन वनपथकाला मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता सदर रस्त्यावर हे वाहन आढळून आले. 

सुरगाणा तालुक्यातील पळसन वनपरिक्षेत्रातील बोरपाडा वन परिमंडळ अंतर्गत असलेल्या भागातून एका पिकप वाहनातून खैर लाकडाची तस्करी होत असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार नाशिक उपवनसंरक्षक पंजक गर्ग,याच्या मार्गदर्शनाखाली बा-हे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. कवर, तसेच फिरते पथकाचे अधिकारी सुरेश गवारी, तसेच पळसन येथील वनपाल बीसी भोये, वनरक्षक टि एच खाडवी, तसेच खडकमाळचे वनरक्षक वाय एस गावित यांचे पथक तयार केले. गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास जंगलाच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. मात्र पथकाची कुणकुण लागताच खैर तस्करांनी  फरार होण्यासाठी वाट बदलली. 

दरम्यान वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ संशयितांचा मागोवा घेत दुसऱ्या वाटेने वाहनाद्वारे त्यांना गाठले. बोरपाडा रस्त्यावरील जात असताना बोरपाडा हद्दीत पथकाने वाहनाद्वारे त्या पिकप गाडीचा पाठलाग सुरू केला. सापळा कारवाई पथकाने खैराच्या लाकडांनी भरलेली गुजरात प्रादेशिक परिवहन विभागाची पासिंग असलेली पिकपगाडी ताब्यात घेत पळसन वनपरिक्षेत्र कार्यालयात आणली.या ठिकाणी वनपरिक्षेत्राचे अधिकाऱ्यांनी वाहनाची जप्ती पंचनामा केला. संशयित पिकप चालकासह अज्ञान तस्करांविरुद्ध पळसन वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget