Chhagan Bhujbal : 2019 च्या शपथविधी आधी नेमकं काय घडलं? छगन भुजबळांनी सांगितली ए टू झेड स्टोरी
Chhagan Bhujbal : 2019 च्या पहाटेच्या शपथविधीबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी ए टू झेड स्टोरी सांगितली आहे.
Chhagan Bhujbal : लहानपणापासून ज्यांना तुम्ही सांभाळलं, राजकारणाचे बाळकडू पाजलं, त्या अजित पवार यांना देखील तुम्ही डावललं. ही सगळी मंडळी का गेली? याचा विचार शरद पवारांनी करावा. हे सगळं भुजबळांनी घडवून आणलं, असा आरोपही केला जात आहे. मात्र ही कल्पना चुकीची असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. त्याचबरोबर 2019 जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, त्याआधी भाजपबरोबर जाण्याचे पवार यांच्या आदेशानुसार ठरलं होतं. मात्र लागलीच त्यांनी हा निर्णय बदलल्याने अजित दादांनी शपथविधी केल्याचा गौप्यस्फोट भुजबळांनी यावेळी केला.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या येवल्यातील सभेनंतर छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत आरोपांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर छगन भुजबळ पहिल्यांदा नाशिकमध्ये (Nashik) आले. यावेळी त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. दुसरीकडे शरद पवार यांनी येवल्याच्या (Yeola) सभेत अंदाज चुकल्याचे सांगत येवलेकरांची माफी मागितली. त्याचबरोबर 2017 आणि 2019 च्या वेळी नेमकं काय घडलं? याचा उलगडा देखील छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी फुटली याच सर्व खापर माझ्यावर टाकलं जात असून मी कुठल्याच चर्चेत नसताना माझं नाव घेतलं जात असल्याचे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले.
छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, येवला येथील सभेत सभेत पवारांनी माफी मागितली, चुकीचा उमेदवार दिला, असे त्यांना सांगायचे होते. मात्र दुसरीकडे क्रिडा संकुलच्या उद्घाटनासाठी आले, तेव्हा बारामतीनंतर येवल्याचा विकास झाला असे म्हणत होते. आता माफी का मागतात ते कळत नाही. मग आता सर्व ठिकाणी माफी मागणार का? किती ठिकाणी माफी मागणार असा सवाल देखील भुजबळांनी केला. हे तुमच्या घरात झाले ना! अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, प्रफुल्ल पटेल ही आमच्यासोबत आहेत. मग हे सर्व मी केले, असे पवारांना वाटत आहे, ते चुकीचे आहे.
2019 च्या शपथविधी आधी काय घडलं?
भुजबळ पुढे म्हणाले की, तेलगी घोटाळ्यात नाव नसताना आरोप करण्यात आले. त्यामुळे जेलमध्ये जावं लागलं. 2017 ला जेलमध्ये होतो, बाहेर काय चालू आहे. याबाबत काही माहीती नव्हती. त्यावेळी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला बाहेर काढलं. आणि राष्ट्रवादी भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा झाली. मात्र तस होऊ शकले नाही. पुन्हा 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यात आली. तेव्हाही शिवसेनेला सोडा असे सांगितले, भाजपने शिवसेना सोडली. या बैठकीत देखील मी नव्हतो. यावेळी देखील राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन करायचं ठरले. त्यावेळी 54 आमदारांच्या सह्या होत्या. यात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार देखील होते. मात्र हा प्रस्ताव देखील फिस्कटला. या दरम्यान अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे बैठकीला उपस्थित होते. 2019 ला देखील बैठक होऊन सरकार स्थापन होऊ शकले. या दरम्यान अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकला. आणि त्यानंतर राष्ट्रवादीने शिवसेना आणि काँग्रेसशी बोलणी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षाबाबत भुजबळ म्हणाले..
छगन भुजबळांनी यावेळी राष्ट्रवादीच्या अध्यक्षाबाबत देखील त्यांनी उलगडा केला. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली. 15 दिवस आधी बैठक झाल्याचे स्वतः सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मी राजीनामा देतो, नंतर तुम्ही काही करा, असे शरद पवार यांनी सांगितल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्याचे भुजबळांनी सांगितले. पण परत पवार साहेबांनी माघार घेतली. सुप्रियाला कार्याध्यक्ष केले, तेव्हा प्रफुल्ल पटेल म्हणाले मी उपाध्यक्ष असल्याने तीन नंबरचे पद कसे घेऊ, मग दोघे व्हा आधी तुमचं नाव घेतो, असेही मी सुचवल्याचे भुजबळ म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Sharad Pawar : येवल्यात मी कोणावर टीका करायला नाही तर माफी मागायला आलोय : शरद पवार