Amit Shah In Nashik : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर, केंद्रीय यंत्रणांनी घेतला आढावा
Amit Shah In Nashik : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shaha) पुढील आठवड्यात नाशिक (Nashik) दौऱ्यावर येत असून ते त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळी भेट देणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
![Amit Shah In Nashik : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर, केंद्रीय यंत्रणांनी घेतला आढावा Maharashtra News Nashik News Union Home Minister Amit Shah on a visit to Nashik Amit Shah In Nashik : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर, केंद्रीय यंत्रणांनी घेतला आढावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/19/1f059b3f6eb3cbab7b1c8bd1b51921f8_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amit Shah In Nashik : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत असून ते त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळी भेट देणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे शहा यांच्या दौऱ्याविषयी सर्वानाच उत्सुकता लागली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गेल्या काही दिवसांपासून राज्याचा दौरा करीत आहेत. त्यानुसार आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मात्र शहा यांचा नाशिक दौरा विशेष असून येत्या 21 जून रोजी म्हणजेच जागतिक योग दिनी आगमन होणार आहे. यावेळी ते त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या गुरुपीठ भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते येथील विविध उपक्रमांना चे उद्घाटन होणार आहे.
गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा नियोजित असल्याने या अनुषंगाने केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक सरकारी यंत्रणांनी गुरुपीठ कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा घेतला. एप्रिलमध्ये स्वामीसेवा मार्गाच्या वतीने चंद्रकांत मोरे आणि डॉ. दिगपाल गिरासे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेत येथील कामांची माहिती दिली होती. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवामार्ग संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुमारे 10 हजार केंद्राच्या माध्यमातून करत असलेल्या अध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याबाबत त्यांना माहिती दिली आणि समर्थ गुरुपीठास भेट देण्याची विनंती केली. सेवामार्गाच्या या विनंतीस मान देऊन शहा जागतिक योग दिनी त्र्यंबकेश्वर नगरीत समर्थ गुरुपीठावर येत आहेत. त्यानुसार शहा जागतिक योग दिनी गुरुपिठाला भेट देणार आहेत.
जागतिक योग दिन आणि सदगुरु मोरेदादा हॉस्पिटल शिलान्यास सोहळ्यास अमी शहा उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अनेक मंत्री, खासदार, आमदार विविध पक्षांचे पदाधिकारी या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमाच्या सुरक्षाविषयक तयारीचा आढावा विविध यंत्रणांकडून घेतला जात आहे.
केंद्रीय यंत्रणाचा आढावा
गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा नियोजित असल्याने या अनुषंगाने केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक सरकारी यंत्रणांनी गुरुपीठ कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा घेतला. याएवली कार्यक्रमस्थळाची पाहणी, रस्त्याची पाहणी इतर ठिकाणांची पाहणी यावेळी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप महानिरीक्षक दर्शनलाल गोला, राकेश कुमार, वरिष्ठ अधिकारी पारस नाथ, योगेश कुमार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कार्तिकी नेगी आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)