एक्स्प्लोर

Trimbakeshwer Fog : अवघं त्र्यंबकेश्वर शहर धुक्यात हरवलं, निसर्गस्पर्शाची अनुभूती देणारा व्हिडीओ पाहिलात का?

Trimbakeshwer Fog : गुलाबी थंडी, पक्षांचा किलबिलाट, हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, अन त्यातही दाट धुक्यात हरवलेलं त्र्यंबकेश्वर शहर.

Trimbakeshwer Fogg : गुलाबी थंडी, दाट धुक्यात हरवलेलं शहर, पक्षांचा किलबिलाट, हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, त्यातून वाहणारा थंडगार वारा, असे गुलाबी वातावरण सध्या त्र्यंबकचा ब्रह्मगिरी पर्वत (Bramhgiri) बुडालाय. नाशिकपासून (Nashik) अवघ्या काही अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहर धुक्यात हरविल्याची चित्र आज अनुभवयाला मिळाले. सध्या या धुक्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.  

त्र्यंबक म्हटलं कि पावसाळा (Rainy) आणि हिवाळा (Winter) दोन्ही ऋतूत अगदी शहर खुलून निघते. काल झालेल्या अवकाळीनंतर आज पहाटेपासून शहरासह ब्रम्हगिरी पर्वत, अंजनेरी (Anjneri) डोंगर धुक्यात न्हाहून निघाल्याचे चित्र होते. एकीकडे अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर कालपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवू लागला आहे. शिवाय बोचऱ्या थंडीतही (Cold) वाढ झाली आहे. त्यामुळे आज पहाटेपासूनच नाशिक स्थरावर धुक्याची दुलई पांघरल्याचे चित्र होते. त्यामुळे शहर वासियांना धुक्याचा सुखद अनुभव मिळाला. दरम्यान सध्या ऊन पावसाच्या खेळात धुक दाटत असून त्र्यंबकेश्वर शहरात आज पहाटेच्या सुमारास अवघड शहर धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळालं. 

दरम्यान सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत धुक्‍याची चादर पसरल्याने पंधरा-वीस फुटांवरील काही दिसत नव्हते. त्यामुळे सकाळच्या सुमारास निघालेले चाकरमाने, मॉर्निग वॉक करणारे यांना आल्हाददायक अनुभूती मिळाली. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांना दिवे सुरू ठेवावे लागले. बच्चे कंपनीला हा अनुभव नवा असल्याने, हे दृश्‍य पाहिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आश्‍चर्याचा भाव दिसत होता. आकाशातील ढग जमिनीवर उतरल्याचा भास होत असल्याचे दृश्‍य पहायला मिळाले. निसर्गाचे हे अद्‌भूत रुप नागरिकांनी डोळ्यांत साठवण्यासारखे होते. दहा वाजल्यानंतर सूर्यदर्शन झाल्यानंतर धुके विरले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर (Nashik trimbakeshwer) दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. वाहनचालकांना अगदी काही अंतरावरचेही स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे वाहनांचा वेग आपोआप कमी झाल्याचे चित्र होते. वाहनांचे दिवे लावून प्रवासाची परिस्थिती त्र्यंबक शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही होती. पहाटे कामाला जाणारे कामगार अंगात स्वेटर आणि डोक्याला मफलर गुंडाळून जाताना दिसले. पहाटे व्यायाम किंवा फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा मनमुराद आनंद घेतला. सूर्योदय झाल्यानंतरही काही काळ त्याचे दर्शन होऊ शकले नाही. शाळेत जाणाऱ्या बालचमूंनी धुक्याची चादर अंगावर घेऊन, उबदार कपड्यातून प्रवास केला. तर अनेक नागरिकांनी निलपर्वतावर जाऊन धुक्याची अनुभूती क्षणचित्रे कॅमेऱ्यात कैद करण्यावाचून राहावलं नाही... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Embed widget