Nashik Air service : नाशिक-दिल्ली विमानसेवेत तांत्रिक बिघाड, विमानसेवा 20 ऑगस्टपर्यंत रद्द? बुकिंग स्टेट्स 'Not Available'
Nashik Air service : नाशिक दिल्ली विमानसेवेमध्ये (Nashik Delhi Air Service) बिघाड झाल्याची माहिती समोर येत असून विमानसेवा सध्या बंद राहणार असल्याची माहिती आहे.
Nashik Air service : नाशिक दिल्ली विमानसेवेमध्ये (Nashik Delhi Air Service) बिघाड झाल्याची माहिती समोर येत असून काही तांत्रिक कारणास्तव विमानसेवा सध्या बंद राहणार असल्याची माहिती आहे. परंतु कंपनीकडून विषय कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पुढील दिवसांचे बुकिंग दाखवत नसल्याचा ट्रॅव्हल एजंट असोसिएशनकडून सांगण्यात आल्याने पुढचे दोन ते तीन महिने स्पाइस जेटची विमानसेवा बंद राहिल अशी शक्यता आहे.
नाशिकची विमानसेवा (Nashik Air Service) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ब्रेक डाऊन होत आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत आहे. अशातच आता स्पाइस जेटकडून (Spice Jet) चालविली जाणारी दिल्ली-नाशिक मार्गावरील विमानसेवा मंगळवार 18 एप्रिलपासून ते 20 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात असल्याचे समजते आहे. कंपनीकडे पुरेशी विमाने उपलब्ध नसून जी आहेत, त्यांच्या मेंटेनन्सची कामे प्रदीर्घ काळ चालणार असल्याचे कारण यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ऐन पर्यटन हंगामात ही सेवा प्रदीर्घ काळ रद्द केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून दिल्लीला जाणारे प्रवासी, उद्योजक, पर्यटक यांच्यात नाराजीचा सूर पहायला मिळत आहे.
दरम्यान नाशिक दिल्ली विमानसेवा बंद होत आहे का? याबाबत कंपनीकडून कुठल्याही स्वरूपाचे ठोस कारण हे सांगितलं जात नाही. मात्र जे प्रवासी प्रवास करत आहेत, जे ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून बुकिंग केलं जातं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पुढील काही महिन्यांसाठी Not Available अशा स्वरूपाचा बुकिंग स्टेटस दाखवत आहेत. त्यामुळे काहीतरी तांत्रिक कारण असून त्यामुळे संपूर्णपणे विमान सेवा ही बंद झाली की काय अशी शक्यता व्यक्त होते आहे. यापूर्वी देखील दोन कंपन्यांची विमान सेवा बंद पडलेली होती. मात्र दुसरीकडे नाशिककरांचा या विमान सेवेला भरभरून असा प्रतिसाद मिळत असताना अशा पद्धतीने विमानसेवा बंद पडत असल्याने नाशिकच्या प्रवासी क्षमतेवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. शिवाय सातत्याने विमानसेवा बंद पडत असल्याने त्याचा एकूणच नाशिकच्या विकासावर आणि इतर गोष्टींवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं आणि विमानसेवा सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.
विमानसेवा 20 ऑगस्टपर्यंत रद्द?
नाशिक विमानतळावरून सध्या इंडिगो कंपनीकडून हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, नागपूर या शहरांकरिता विमानसेवा दिली जात आहे. स्पाइस जेटकडून दिल्लीकरता विमानसेवा सुरू होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून त्यात सातत्य नसल्याचे वारंवार समोर आल्याने ही सेवा कंपनी कधीही बंद करू शकते अशी चर्चाही सुरू होती. महिनाभरापासून स्पाइस जेट कंपनीकडे सध्या फ्लाईट्चा तुटवडा असून टर्किश एअरच्या विमानाद्वारे नाशिकला सेवा दिली जात होती. ऐन पर्यटनाच्या हंगामात सेवा बंद झाल्याने नियोजन ढासळणार आहे.