Nashik Air service : नाशिककरांना न्यू इअर गिफ्ट, स्पाइस जेट, इंडिगोची एअर सर्व्हिसला किक
Nashik Air service : नव्या वर्षांत नाशिकची एअर कनेक्टिव्हिटी वाढणार असून मार्चपासून विमानसेवा सुरू होणार आहे.
Nashik Air service : गेल्या काही दिवसांपासून नाशिककरांना (Nashik) चालू बंद विमानसेवेमुळे (Air service) नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता नवीन वर्षात हा त्रास कमी होणार असून नाशिककरांना नव्या वर्षाचे गिफ्ट मिळणार आहे. त्यानुसार मार्चपासून स्पाइस जेट (Spice Jet) आणि इंडिगोने विमानसेवा (Indigo) सुरू होणार आहे.
गेल्या काही महिन्यापासून नाशिकची विमान सेवा बारगळल्याच्या स्थितीत होती. तर दुसरीकडे मध्यतंरी दुरुस्तीच्या कामामुळे नाशिक विमानतळ महिनाभर बंदही करण्यात आले होते. या सर्वांचा परिणाम विमानसेवेवर झाला होता. त्यामुळे नाशिकहून फक्त एकच विमानसेवा सुरु होती. मात्र नव्या वर्षात दोन कंपन्यांही सेवा नाशिक विमानतळाला पुन्हा एकदा सुरु होणार असून नव्या वर्षांत नाशिकची एअर कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याची चिन्हे आहेत. नाशिकहून दिली आणि हैदराबाद पाठोपाठ मार्च 2023 पासून स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्या गोवा नागपूर अहमदाबाद बेळगाव बेंगलोर विमानसेवा सुरू करण्याची शक्यता आहे यामुळे नाशिक विमानतळाला देशातील सात मोठी शहर एअर कनेक्टिव्हिटी जोडली जाणार आहेत.
आगामी 2023 या वर्षातील मार्चपासून स्पाइस जेट आणि इंडिगोने विमानसेवा सुरू होणार आहेत. नाशिकहून दिल्ली आणि हैदराबाद पाठोपाठ, बेंगलोर, गोवा, नागपूर, अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. स्पेस जेट आणि इंडिगो या विमान कंपन्यांकडून मार्च 2023 ते ऑक्टोबर 2023 चे समर शेड्युल जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून रडतखडत सुरू असेलली नाशिकची विमान सेवा आता पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. अनेक विमान सेवा बंद असल्याने स्थानिक उद्योजक व्यवसाय आणि सजग नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती, मात्र पुन्हा एकदा विमानसेवा सुरु होणार असल्याने व्यापारी, उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
असे आहे संभाव्य वेळापत्रक (इंडिगो कंपनी)
सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी सुटेल 8 वाजून 55 मिनिटांनी पोहचेल. 9 वाजून 15 मिनिटांनी सुटेल, ते 11 वाजून 20 मिनिटांनी पोहचेल. 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल, ते 1 वाजून 35 मिनिटांनी पोहचेल. 1 वाजून 55 मिनिटांनी सुटेल, ते 3 वाजून 20 मिनिटांनी पोहचेल. 3 वाजून 40 मिनिटांनी सुटेल, ते 5 वाजून 05 मिनिटांनी पोहचेल. 05 वाजून 25 मिनिटांनी सुटेल, ते 7 वाजून 15 मिनिटांनी पोहचेल. 07 वाजून 35 मिनिटांनी सुटेल, ते 9 वाजून 25 मिनिटांनी पोहचेल. 9 वाजून 45 मिनिटांनी सुटेल, ते 11 वाजून 40 मिनिटांनी पोहचेल. अशा वेळेत या विमानसेवा नाशिककरांना अनुभवता येणार आहे. तर दिनांक 23 मार्चपासून ते 28 ऑक्टोबर पर्यंत ही सेवा असणार आहे.
असे आहे संभाव्य वेळापत्रक (स्पाईसजेंट कंपनी)
नाशिक - दुपारी 2.50- दुपारी 4.40 (नवी दिल्ली), नवी दिल्ली - दुपारी 12.35 - दुपारी 2.40 (नाशिक), नाशिक - सकाळी 8.20 - सकाळी 9.55 (हैदराबाद). हैदराबाद - सकाळी 6.20 - सकाळी 7.55 (नाशिक), नाशिक - सकाळी 10.25 - दुपारी 12 (अहमदाबाद), अहमदाबाद - दुपारी 12.30 - दुपारी 2.05 (गोवा), बंगळुरू - सकाळी 7.55 - सकाळी 10.5 (नाशिक), गोवा - रात्री 4.30 - रात्री 5.40 (नाशिक), नाशिक - रात्री 8 - रात्री 8.10 (बंगळुरू).