Nashik Crime : लॉकअपमधील संशयित स्वतःला संपवत होता, मात्र ड्युटीवरचा पोलीस बनला देवदूत, असे वाचविले प्राण
Nashik Crime :संशयित आरोपी स्वतःला संपवत असताना ड्युटीवर असलेल्या पोलिसाच्या धाडसी निर्याणामुळे त्याचे प्राण वाचले आहे.
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) अंबड पोलीस ठाण्यातील (Ambad Police Station)धक्कादायक घटना समोर आली असून संशयित आरोपीने पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात वेळीच स्थानिक लॉकअप गार्ड पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला आहे. संबंधित संशयिताला पोलिसाने आत्महत्येपासून परावृत्त केले आहे. संशयिताने बाथरुममध्ये फरशीने हाताची नस कापून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला.
नाशिक शहरातील (Nashik Crime) गुन्हेगारी वाढत असून दुसरीकडे पोलिसांकडून वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) करुन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले जात आहे. दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत नाशिक शहर पोलिसांनी दीडशेहून अधिक संशयितांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. अशातच अंबड पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये असलेल्या संशयित आरोपीने फरशीच्या तुकड्याने मनगटाची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशाल कुऱ्हाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुऱ्हाडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी या आरोपीने अंबड येथील घरकुल योजनेत एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी संशयिताला अंबड पोलिसांनी अटक केली होती. विशाल संतोष कुऱ्हाडे हा नाशिकच्या अंबड येथील राहणारा असून पोलिसांनी तपास केला असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस नाईक कमलेशावर यांनी फिर्याद दिली आहे. आवारे हे अंबड पोलीस ठाण्यात लॉकअप गार्ड इंचार्ज म्हणून कर्तव्यावर होते. त्यावेळी दुपारी चारच्या सुमारास लॉकअप मध्ये असलेला आरोपी विशाल संतोष कुऱ्हाडे हा लॉकअपमधील बाथरूममध्ये गेला होता. त्यावेळी त्याने तेथे असलेल्या फरशीच्या तुकड्याने स्वतःच्या डाव्या मनगटाची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला ही बाब लक्षात आल्यानंतर आवारे यांनी त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.
संशयित सराईत गुन्हेगार
दरम्यान विशाल कुऱ्हाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. जीवे मारण्याच्या गुन्ह्यात विशाल कुऱ्हाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र कुऱ्हाडेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून रात्री उशिरा अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर करत आहेत.