Dada Bhuse : आकडेवारीवर बोलत नसतो, दसरा मेळाव्यालाच तुफान गर्दी बघा : मंत्री दादा भुसे
Dada Bhuse : आकडेवारीवर आपण बोलत नसतो, दसरा मेळाव्याला (Dasara Melava) ग्राउंडवर शिवसैनिकांसह लोकांची गर्दी दिसेल, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी दिली आहे
Dada Bhuse : दसरा मेळाव्याला (Dasara Melava) अलोट गर्दी होणार असून आकडेवारीवर आपण बोलत नसतो, फिल्डवर, ग्राउंडवर शिवसैनिकांसह लोकांची गर्दी दिसेल, रिझल्ट्स दिसेल अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी दिली आहे.
बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक (Nashik) जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे पालकमंत्री झाल्यानंतर नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी दसरा मेळाव्याच्या तयारी संदर्भात माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, दसरा मेळाव्याची तयारी यापूर्वीच केली असून याबाबतची बैठक पार पडली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तालुक्याचे नियोजन झाले. अतिशय उस्फुर्त प्रतिसाद जनतेचा मिकणार यात शंका नाही. शिवाय हा दसरा मेळावा न भूतो न भविष्यती होणार असल्याचे भुसे म्हणाले.
मंत्री भुसे यांना शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना वाहतूक कोंडी (traffic Jam) अडकून ठेवण्याची तक्रार काही लोकप्रतिनिधी केलेली आहे. तुमच्याकडून कुठेतरी वाहतूक कोंडी होईल किंवा त्यांच्या मार्गामध्ये अडथळे येतील अशी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. यावर भुसे म्हणाले, एवढ्या खालच्या पातळीवर जाणारे कार्यकर्ते, शिवसैनिक नाहीत. शिवसेनाप्रमुखांची अशी शिकवण नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान शिंदेसेनेकडून नुकताच दसरा मेळाव्याचा टिझर लॉन्च करण्यात आला. यामध्ये एकलव्य नावापुढे धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचा फोटो लावण्यात आला आहे? यावर आपली प्रतिक्रिया काय? असा भुसे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली आणि ती धर्मवीर आनंद दिघे यांनी जनमानसात रुजविण्याचे काम केले. शिवाय आम्ही दिघे साहेबांना शिवसेनाप्रमुखांचा ढाण्या वाघ बोलतो. शिवसेनाप्रमुखांना जे अपेक्षित कार्य आहे ते कार्यपुढं देण्याचा प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम धर्मवीर दिघे साहेबांनी केलेले आहे. यावर मग द्रोणाचार्य कोण? अर्जुन कोण? या प्रश्नां अर अपेक्षित उत्तर भुसे यांच्याकडून मिळाले नाही.
प्रत्येक शिवसैनिक येणार
राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर शिवसैनिक असून भले तो झोपडीतला असेल रस्त्यावरचा असेल तो जनतेची सेवा करीत असतो. जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो त्याप्रमाणे त्याची कार्यपद्धती आहे. आणि अशा लाखो शिवसेनिकांच्या कष्टावर त्यांच्या कामावर त्यांच्या रक्तावर शिवसेना उभी राहिलेली आहे. तो प्रत्येक शिवसैनिक दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार ग्वाही मंत्री दादा भुसे यांनी दिली.