एक्स्प्लोर

Nashik Shubhangi Patil : ज्या काँग्रेसने भरभरुन दिलं, त्याच पक्षाला गाफील ठेवत दगाबाजी केली, शुभांगी पाटील यांचा गंभीर आरोप 

Nashik Shubhangi Patil : शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. 

Nashik Shubhangi Patil : ज्या काँग्रेसने (Congress) तुम्हाला भरभरुन दिलं, तिसरी पिढी तुमची खात होती, तरी तुम्ही त्याच काँग्रेसला गाफील ठेवत तुम्ही दगाबाजी केली, काँग्रेसचे जर होता तर तुम्ही एबी फार्म का भरला नाही, मग आता तुम्ही काँग्रेसचे आहात असं कस म्हणता, जे पक्षाला झाले नाहीत ते जनतेला काय होणार असे म्हणत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवार शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. 

नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या जळगावात (Jalgoan) आल्या आहेत. मला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे, त्यामुळे या निवडणुकीत विजयासाठी आपण महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे जात असल्याचे शुभांगी पाटील यांनी सांगितले आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदासाठीचे चेहरा होते, परंतु असं होऊ नये म्हणून भाच्याने ही खेळी केली. मात्र जे बाळासाहेब थोरातांचे झाले नाहीत ते जनतेचे काय होतील, असा हल्लोबोलही शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर केला आहे.

विजय माझाच होईल : शुभांगी पाटील

"राजा का बेटा राजा नही हो सकता, जिसमे काबिलीयत है, वही राजा हो सकता है, मी सामान्य कुटुंबातील आहे, त्यामुळे जनतेची मला पंसती असून मला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे, असे म्हणत विजय माझाच होईल," असा टोला नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवार शुभांगी पाटील यांनी त्यांचे विरोधक अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना लगावला आहे.

जळगाव दौऱ्यावर असलेल्या सुधीर तांबे यांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी भेट घेतली, यावर शुभांगी पाटील यांना विचारले असता, अतिथी देवो भव: याप्रमाणे तांबे यांची भेट घेतली असेल, भेटीचं आपल्या काही वाटत नाही, पण महाविकास आघाडीतील पक्ष हे माझ्याच पाठीशी आहेत. त्यामुळे विजय आपलाच होईल असे स्पष्टीकरण सुद्धा यावेळी शुभांगी पाटील यांनी दिले.

प्रचाराचा धुराळा जोरात...

महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केल्यानंतर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा प्रचार दौरा जोरात सुरु आहे. कालच त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रचाराचा नारळ फोडला. आता त्या जळगाव जिल्ह्यातील अनेक भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना देखील मतदारांचा वाढता पाठिंबा आहे. त्यामुळे नाशिक पदवीधारची निवडणूक हि चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे येत्या 30 जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget