एक्स्प्लोर
शुभांगी पाटील बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर, वॉचमन दारही उघडेना! थोरातांना फोन करत म्हणाल्या, हॅलो साहेब....
अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा नगर जिल्ह्यात प्रचार दौरा सुरू आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या भेटीला गेल्या असता दारावरच त्यांना ताटकळत उभं राहून शेवटी न भेटता त्यांना माघारी फिरावं लागलं.

Nashik Graduate Constituency Shubhangi patil
Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Latest News) प्रचाराचा धुरळा उडाला असून उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत अशातच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा सध्या नगर जिल्ह्यात प्रचार दौरा सुरू आहे. संगमनेर येथील बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या भेटीला गेल्या असता दारावरच त्यांना ताटकळत उभं राहून शेवटी न भेटता त्यांना माघारी फिरावं लागलं.
महाविकास आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. नगर जिल्ह्यापासून त्यांनी सुरुवात करत संगमनेर तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. याचवेळी त्या बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना गेटवरच काही वेळ उभं राहावं लागलं. वॉचमनने अनेकदा सांगूनही दार उघडले नाही. यावेळी शुभांगी पाटील यांनी फोनवरूनच थोरात यांच्याशी संपर्क साधत माघारी फिरल्या.
यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या संपर्क साधत म्हणाल्या की , 'हॅलो साहेब, नमस्कार मी घरी आले होते. वॉचमन तर गेट पण नाही उघडतं, आशीर्वाद घ्यायला आले होते. त्यांना म्हटलं मला येऊ तर द्या मध्ये. पण ते नाही म्हणत आहेत. यावर वॉचमन बोलल्यावर समजले की घरी कुणीच नाही, थोरात हे देखील मुंबईत हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यामुळे शुभांगी पाटील या पुन्हा माघारी फिरल्या, पुढल्या प्रचार दौऱ्याला सुरवात केली.
यावेळी माध्यमांशी बोलतांना पाटील म्हणाल्या की, अडवलं नाही, घरात कोणीच नव्हतं, कोणी नव्हतं तर मग कशाला आपण त्रास द्यायचा. कारण की घरात ताईसाहेब वगैरे कोणीच नाही, सकाळी साहेबांना फोन केला होता, त्यांच्या खांद्याला दुखापत झालेली आहे, म्हणून साहेब हॉस्पिटल असल्याचे समजले, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.
थोरात साहेब भाचीला मदत करतील...
बाळासाहेब थोरात हे आमचेच नेते आहेत, ते आपल्या भाचीला नक्की साथ देतील. जे पक्षाचे होऊ शकले नाहीत ते आपले काय होणार? त्यामुळे खात्री आहे, की विजय माझाच होईल असं म्हणत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्यावर निशाणा साधला...त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रचाराला सुरुवात केली...सोबतच आपल्याला नगर जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करत आपणच विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही बातमी देखील वाचा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























