एक्स्प्लोर

Trimbakeshwar News : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी असं असणार टाईमटेबल

Nashik News : श्रावण महिन्याला (Shravan) सुरवात झाली असून नाशिकजवळील त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) भाविकांचा मोठा उत्साह दरवर्षी पाहायला मिळतो.

नाशिक : अधिक मास समाप्तीनंतर (Adhik Mas) श्रावण महिन्याला (Shravan) सुरुवात झाली असून नाशिकजवळील त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) भाविकांचा मोठा उत्साह दरवर्षी पाहायला मिळतो. राज्यभरातून लाखो भाविकांची उपस्थिती श्रावण सोमवारसह श्रावण महिन्यात पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्रावण महिन्यात होणारी गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी मंदिर दररोज सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत तर एकुण 4 श्रावण सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 पर्यंत खुले असणार आहे. 

श्रावण म्हटला हिंदू धर्मात पवित्र महिना म्ह्णून ओळखला जातो. या महिन्यात महादेवाला पूजले जाते. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची अलोट गर्दी असते. यंदा तर अधिक मास होता. त्या मासातही प्रचंड गर्दीने त्र्यंबकेश्वर फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कालपासून श्रावण महिन्याला सुरवात झाल्याने या गर्दीत वाढ होणार आहे. म्हणूनच मंदिर प्रशासनाने दर्शनाची वेळ वाढवून घेत भाविकांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार त्र्यंबकेश्वर मंदिर दररोज सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत तर एकूण 4 श्रावण सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 पर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आद्य ज्योतिर्लिंग असल्याने देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) हे नेहमी गजबजल्याचे दिसून येते. अधिक मासातही लाखो भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर आता श्रावण सुरु झाल्याने भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर विश्वस्त समिती, पोलिसांच्या वतीने खास नियोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे हजारो भाविक दर्शनासाठी उभे राहू शकतील. ज्येष्ठांना या दर्शनरांगेत बसण्याची व्यवस्था असून पिण्याचे पाणी तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आला आहे. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांचे दर्शन सुलभ होऊ शकणार आहे. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. सकाळी मंदिर उघडल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा मात्र सोबत ठेवावा लागेल. देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजातून सुरू होईल, असे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे. 

शहरातील मंदिराचे नियोजन 

तर नाशिक शहरातील सोमेश्वर मंदिर या ठिकाणी देखील श्रावण महिन्यात मोठी गर्दी पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर सोमेश्वर मंदिर प्रशासनाने देखील महत्त्वाचा निर्णय घेत श्रावणानिमित्त पहाटे चार वाजेपासून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात श्रावणानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली असून श्रावण सोमवारी या मंदिरात मोठी गर्दी होत असल्याने त्या दृष्टीने दर्शन रांगेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या कपालेश्वर मंदिरात देखील श्रावणात मोठी गर्दी पाहायला मिळते. या मंदिरात देखील पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. सोमवारी आणि शनिवारी रात्री पालखी मंदिरात येईपर्यंत खुले राहील. मंदिरावर खास विद्युत रोषणाई सह मंदिरात वेळोवेळी दैनंदिन पूजा अभिषेक सोहळा पार पडणार आहे.

भाविकांना दक्षतेचे आवाहन

त्र्यंबकेश्वर येथे 20 ऑगस्ट ते 12 सप्टेबर 2023 या कालावधीत श्रावण सोमवार निमित्त यात्रेसाठी सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी व प्रदक्षिणेसाठी येतात. यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे. यात्राकाळात भाविकांनी आपल्या सोबत कमीत कमी सामान आणावे. मौल्यवान चीज वस्तू आणु नये. मंदिरात भाविकांना बॅगस् व पिशव्या इत्यादी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यात्रेत कोणतीही बेवारस अगर संशयित वस्तु आढळून आल्यास स्पर्श न करता त्वरीत पोलीसांच्या निदर्शनास आणावे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्यास  याबाबत पोलीसांच्या निदर्शनास आणावी. भाविकांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत. यात्रेत कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोणी जाणुन-बुजुन अफवा पसरवत असल्यास तसे पोलीसांना तात्काळ कळविण्यात यावे. यात्रा काळात भाविकांनी खालील सुचनांचे करावे पालन करावे, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

फेरी मार्गावरील खड्डे बुजवणार

श्रावणात त्र्यंबकेश्वर ची फेरी खूप महत्त्वाचे असते. लाखो भाविक श्रावणातील सोमवारी या फेरीत सहभागी होतात. मात्र सदस्य या फेरी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याचं निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने नियोजन सुरू केले असून फेरी मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजवण्यास रस्ता समतोल करणे, तसेच या मार्गावर विजेची व्यवस्था करण्याचे आदेश त्रंबकेश्वर इगतपुरीचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर बीडीओंना दिले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी, 400 मीटरपर्यंत रांगा, एक लाख भाविकांची उपस्थिती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget