Nashik News : नाशिकमध्ये रोबोट विझवणार आग! नऊशे डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा आग विझवण्याची क्षमता
Nashik News : आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक महापालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
![Nashik News : नाशिकमध्ये रोबोट विझवणार आग! नऊशे डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा आग विझवण्याची क्षमता maharashtra news nashik news Robots will put out fires in Nashik Nashik News : नाशिकमध्ये रोबोट विझवणार आग! नऊशे डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा आग विझवण्याची क्षमता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/b080bf4a90ea372e8e8679ccf26e0b7c1673699635926441_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. वाहने असो, कि कंपनी आगीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. इगतपुरीच्या जिंदाल कंपनीतही अशाच प्रकाराने भीषण आगीची घटना घडली. त्यामुळे भविष्यात देखील अशा प्रकारच्या आगीच्या घटनांचा सामना करावा लागू शकतो, या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यांत मागील काही महिन्यात आगीच्या (Fire) घटनांनी धुमाकूळ घातला. नुकतीच नववर्षाच्या सुरवातीला इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव ग्रामपंचायत हद्दीतील जिंदाल कंपनीत स्फोट होउन झालेल्या अग्निकांडाने जिल्ह्यासह राज्य हादरले होते. नाशिक शहरात देखील अधूनमधून आगीच्या घटना घडतं असतात. भविष्यात अशा घटना शहरातील औद्योगिक वसाहती अथवा इतरत्रही घडण्याची भिती नाकारता येत नाही. त्यामुळे आता शहराच्या सुरक्षेसाठी नाशिक महापालिका अग्निशमन विभाग आग विझवणारा रोबोट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. मुंबईच्या धर्तीवर पालिका रोबोट खरेदी करणार आहे.
राज्यात केवळ मुंबई (Mumbai) येथे आग विझवणार्या रोबोटची (Robot) व्यवस्था आहे. आता नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाने देखील शहरात या पद्धतीचा रोबोट असावा याकरिता पुढिल आठवड्यात दोन कंपन्यांना पाचारण करण्यात आले असून ते महापालिकेत येऊन रोबोटद्वारे आग विझवण्याचे प्रात्याक्षिके सादर करणार आहेत. आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार व अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांसमोर रोबोटद्वारे अग्निशमनचे प्रात्याक्षिके सादर केले जाईल. महापालिकेच्या अपेक्षेच्या कसोटीवर खरे उतरल्यास रोबोट खरेदीचा विचार केला जाईल. साधारणत: या रोबोटची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेली जिंदाल सारखी आगीची भीषण घटना घडली. या घटनेवेळी आगीचे प्रचंड मोठे लोळ, जीवघेणा धूर या परिस्थितीत आग विझवताना अग्निशमन कर्मचार्यांना मोठी कसरत करावी लागली. अनेकदा शहरातील गल्ली बोळ, किंवा मोठं मोठ्या एमआयडीसी सारख्या ठिकाणी बचाव कार्य करणे जिकिरीचे ठरते. अशावेळी आगीचा प्रसंग जीवावर देखील बेतू शकतो. त्यामुळे रोबोट खरेदीचा प्राधान्याने विचार सुरु आहे. कितीही मोठी आग असली तरी नऊशे डिग्री तापमानात देखील रोबोट आतमध्ये जात पाण्याची फवारणी करु शकतो. अग्निशमन अधिकारी सुरक्षित अंतरावर थांबून रिमोटद्वारे रोबोटला सहज ऑपरेट करु शकतात. मुंबई महापालिकेकडे असा रोबोट आहे. त्या पार्श्वभुमीवर अग्निशमन विभागाने ज्युपिटर, साई या दोन कंपन्याशी रोबोटसाठी बोलणी सुरु केली आहे. या दोन्ही कंपन्यांना डोमो देण्यासाठी महापालिकेत पाचारण केले आहे.
रोबोटमध्ये नऊशे डिग्री सेल्सिअस
दरम्यान मुंबई महापालिकेकडे असलेल्या या रोबोटचे वैशिष्ट म्हणजे तब्बल नऊशे डिग्री सेल्सिअस तापमानात उभ राहून आग विझवू शकतो. आग लागल्यावर धूर आणि आगाच्या ज्वाला इतक्या भयंकर असतात कीं बंब घेऊन देखील आग आटोक्यात आणणे शक्य होत नाही. जिंदाल कंपनी दुर्घटनेनंतर आता अग्निशमन विभाग अलर्ट झाला आहे. भविष्यात अशी भीषण घटना घडल्यास त्यास तोंड देण्यासाठी आग विझवणार्या रोबोट खरेदीची तयारी सुरु केली आहे. हा रोबोट पालिकेला उपलब्ध झाल्यास शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने खुपच महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)