एक्स्प्लोर

Nashik News : खबरदार! खासगी बसमध्ये अवैध वाहतूक कराल तर? नाशिकच्या वेशीवर पोलिसांचा ताफा

Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) खासगी बसची अवैध वाहतूक रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) हद्दीवर बंदोबस्त तैनात केला आहे.

Nashik News : नाशिक (Nashik) बस दुर्घटनेनंतर (Bus Accident) पोलीस एक्शन मोडवर आले असून खासगी बसेसवर कारवाईची मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. नाशिक पोलिसांनी आखून दिलेल्या सहा चेकपॉईंटवर दिवसभरात 55 बसेसवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास 1 लाख 94 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी बसेस चालकांनी तसेच ट्रॅव्हल्स व्यवसायिकांनी नियमांच्या अधीन राहून वाहतूक करावी, असे आवाहनच आता नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik) तपोवन परिसरात खासगी बस ट्रॅव्हल्सचा भीषण (Nashik Bus Fire)  अपघात झाला. यामध्ये बसला आग लागल्याने तब्बल बारा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करत चौकशीचे आदेश दिले. त्याचबरोबर अपघात चौफुलीवर योग्य त्या सुविधा करण्याच्या सुचनांसह पोलीस प्रशासनाला खासगी ट्रॅव्हल्स संदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यांनुसार दोन दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी सर्व यंत्रणांना सहभागी करून घेत या विषयावर बैठक घेतली. त्यानुसार शहरातील महत्वाच्या ठिकाणी चेकपॉईंटसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 

दरम्यान बैठकीनंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) प्रदीप शिंदे यांनी सर्व खासगी प्रवाशी वाहन मालक, व्यवस्थापक यांना मार्गदर्शन व सूचना देऊन बेकायदेशीर वाहतूक न करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार शहरातील दिंडोरी रोड जकातनाका, पेठरोड जकातनाका, शिलापूर टोलनाका, शिंदे पळसे टोलनाका, 9 वा मैल मुंबई आग्रा, गौळाणे फाटा इत्यादी सहा पॉईंटची निवड करून सदर ठिकाणी  प्रत्येक पॉईंटवर पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी, 2 पुरुष अंमलदार, 01 महिला अंमलदार, शहर वाहतूक शाखेकडील 02 अंमलदार व प्रादेशिक परिवहन विभागाकडील 01अधिकारी नियुक्त करण्यात आले. 

नाशिक शहरातील सहा पॉइंटवर मागील 24 तासांत अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस वर कारवाई करण्यात आली. यामध्ये 142 बसेस तपासून 55 बसेसवर कारवाई करण्यात आली. खासगी बसेसवर कारवाई करून जवळपास 01 लाख 94 हजाररुपये दंड वसूल करण्यात आला. तरी सर्व खासगी बस मालक, व्यवस्थापक यांनी कोणत्याही प्रकारे नियमबाह्य प्रवाशी वाहतूक करू नये असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईमउळे आतातरी वाहनचालकांनी अवैध वाहतूक टाळून, बेदरकारपणे वाहन न चालविता नियमात राहून वाहतूक करणे क्रमप्राप्त राहणार आहे, अन्यथा नाशिक पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 

दोन दिवसांपासून धडक कारवाई 
दरम्यान नाशिक बस दुर्घटननंतर पोलीस प्रशासन खासगीबससेच्या अवैध वाहतुकी विरोधात जोरदार पाऊले उचलत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पथक तयार केले असून सहा ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. यामुळे नाशिकमध्ये येत असलेल्या खासगी बसेसची कसून चौकशी करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून बसेसवर कारवाईड देखील करण्यात येत आहे. या पूर्वी 115 बसेसची तपासणी करण्यात येऊन 31 बसेसवर कारवाई करण्यात आली होती. या बस मालकांकडून 76 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. तर एक बस जप्त देखील करण्यात आली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करा 'हे' छोटे उपाय; वर्षभर नशीब फळफळेल, आरोग्यही राहील ठणठणीत
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Embed widget