एक्स्प्लोर

Nashik Malegaon : एनआयएच्या मुंबई टीमची मालेगावात कारवाई, पीएफआयशी संलग्न असलेल्या संशयित ताब्यात, पाच तासांच्या चौकशीनंतर सोडलं

Nashik News : आज पहाटे एनआयएच्या मुंबई टीमने मालेगाव (Malegaon) शहरात एकावर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मालेगाव : काही महिन्यापूर्वी एटीएसच्या (ATS) माध्यमातून पीएफआयशी संबंधित असलेल्या संशयिताला अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले होते. अशातच आज (13 ऑगस्ट) पहाटे पुन्हा मालेगाव (Malegaon) शहरात एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची पाच तास चौकशी करण्यात आली. एनआयएच्या मुंबई टीमने मालेगावात कारवाई पीएफआयशी संलग्न असलेल्या एका संशयितास ताब्यात घेत त्याची चौकशी केली. चौकशीसाठी पुन्हा बोलवलं जाईल असं सांगून त्याला सोडलं.

सातत्याने नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव हे दहशतवादी कारवाया करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील एक मुख्य केंद्र होऊ पाहत आहे. कारण काही महिन्यापूर्वी झालेल्या कारवाईनंतर आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगावात NIA ने कारवाई केली आहे. शहर पोलीस ठाणे (Malegaon Police) हद्दीतील मोमीनपुरा भागात राहणाऱ्या गुफरान खान सुभान खान (Gufran Khan) याच्या घरी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास झाडाझडती घेत त्याला घरातून ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात नेले. गुफरानचा परदेशात कोणाशीतरी संपर्कात असून मोबाईलवरुन परदेशात कॉल करतो, तसेच तो पीएफआय (PFI) संघटनेचा सदस्य असून तो मुलांना फिजिकल ट्रेनिंग देण्याचे काम करत असल्याचा त्याच्यावर संशय होता. एनआयएच्या मुंबई टीमने त्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तिथे त्याची पाच तास चौकशी करुन सोडलं. चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात येईल असं सांगून एनआयएने त्याला सोडलं.

दरम्यान यापूर्वी देखील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून पीएफआयशी संबंधित काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर दहशतवादी संघटनांना मदत करण्याच्या कारणावरुन मधल्या काळामध्ये एकाला अटक करण्यात आली होती. मालेगावलाच गेल्या वर्षी PFI संघटनेविरुद्ध दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो आरोपीही होता. दरम्यान झाडाझडतीत तो मोबाईल आढळून आला का? इतर काही आक्षेपार्ह कागदपत्रे NIA च्या हाती लागली आहेत का? याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नसून या कारवाईमुळे बंदी घालण्यात आलेली PFI संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबईहून (Mumbai) आलेल्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये संशयिताची दहशतवादी कारवायांच्या कारणावरुन चौकशी झाली.

संशयितांची चौकशी सुरु 

एनआयएची टीम पहाटे मालेगावात दाखल झाली. पीएफआय या प्रतिबंधित संघटनेच्या एका संशयिताला ताब्यात घेतले. काही महिन्यापूर्वी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मालेगाव शहरातून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची मालेगाव पोलीस ठाण्यात चौकशी सुरु आहे. दरम्यान झाडाझडतीत तो मोबाईल आढळून आला का? इतर काही आक्षेपार्ह कागदपत्रे NIA च्या हाती लागली आहेत का? याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नसून या कारवाईमुळे बंदी घालण्यात आलेली PFI संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

इतर संबंधित बातमी : 

NIA Malegaon Arrest : NIAच्या मुंबईची मालेगावात मोठी कारवाई, PFI संलग्नसह असल्याप्रकरणी एक ताब्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget