Nashik Kalika Mandir : नाशिकच्या कालिका मातेच्या तात्काळ दर्शनासाठी मोजावे लागणार शंभर रुपये, नवरात्रीनिमित्त मंदिर सजले!
Nashik Kalika Mandir : नाशिकचे (Nashik) ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरात भाविकांना नऊ दिवस 24 तास (Kalika Devi Mandir) दर्शन घेता येणार आहे.
Nashik Kalika Mandir : नवरात्रोत्सवानिमित्त (Navratri 2022) ग्रामदैवत श्री कालिका देवी यात्रा उत्सवात सोमवारपासून प्रारंभ होत असून त्या दृष्टीने तयारीला वेग आला आहे. यात्रा काळात भाविकांना नऊ दिवस 24 तास कालिकामातेचे (Kalika Devi Mandir) दर्शन घेता येणार आहे. तात्काळ दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांना शंभर रुपयांची देणगी पावती घ्यावी लागणार आहे अशी माहिती संस्थांनचे अध्यक्ष केशव पाटील (Keshav Patill) यांनी दिली.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवासाठी शहर परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. नाशिक (Nashik) शहराचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर कालिका संस्थान विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. कालिकादेवी मंदिराच्या यात्रोत्सवाला 26 सप्टेंबर पासून सुरवात होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त यात्रोत्सव होत असल्याने नेहमीपेक्षा यंदा भाविकांची गर्दी वाढणार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर कालिका देवी दर्शन 24 तास दर्शन घेता येणार आहे.
दरम्यान यांसंदर्भांत बैठक पार पडली. यामध्ये विविध विषयांवर चर्चासह यंदाच्या यात्रोत्सवाला विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांग, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रांगणात वॉटर प्रूफ मंडप उभारण्यात येणार आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच खाजगी सुरक्षारक्षक देखील तैनात केले जाणार आहेत. प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थांतर्फे भाविकांना मंदिराच्या प्रांगणात 50 खोल्यांचे भव्य भक्ती निवास उभारण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांचे निवासाची व्यवस्था होणार आहे. यात्रोत्सवात दर्शनासाठी येणार भाविकांचा दोन कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे.
यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीस मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, मनपा पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यासह विविध कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांनी मंदिर परिसरात पाणी केली. नवरात्रोत्सवात गडकरी चौक ते हॉटेल संदीप पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच चांडक सर्कल कडून महामार्ग बसस्थानकाकडे जाणाऱ्या श्रीहरी कुठे मार्गावरील वाहतूक तूप साखरे लॉन्स कडून वळविण्यात येणार आहे.
फेरीवाल्यांना मंदिरासमोर जागा नाही
यंदा कालिका देवी मंदिर ट्रस्टकडून नियोजन करण्यात आले असून तब्बल दोन वर्षानंतर कालिका यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी दुकाने थाटली जातात. मात्र यंदा गर्दी लक्षात घेता ही दुकाने मंदिराच्या समोरील रस्त्याच्या एका बाजूला असणार आहेत. यात्रोत्सवाला होणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता गोल्फ क्लब मैदान व महामार्ग बस स्टँड परिसरात वाहने पार्किंगसाठी नियोजन केले जात आहे. तसेच पार्किंगचा ठेका महिला बचत गटांना दिला जाणार आहे.
यात्रोत्सवात भाविकांसाठी व्यवस्था
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांग, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रांगणात वॉटर प्रूफ मंडप उभारण्यात येणार आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच खाजगी सुरक्षारक्षक देखील तैनात केले जाणार आहेत. प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थांतर्फे भाविकांना मंदिराच्या प्रांगणात 50 खोल्यांचे भव्य भक्ती निवास उभारण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांचे निवासाची व्यवस्था होणार आहे. यात्रोत्सवात दर्शनासाठी येणार भाविकांचा दोन कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे.