Nashik News : नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती, अन्य तेरा समित्यांचा कार्यक्रम जाहीर
Nashik News : नाशिक बाजार समिती (Bajar Samiti election) निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) बाजार समितीच्या (Nashik Bajar Samiti) निवडणुका पूढे ढकलण्यात आल्या असून ग्रामपंचायत निवडणुकांच्या (Grampanchayat) पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने नाशिक बाजार समिती (Bajar Samiti election) निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील अन्य बाजारसमित्यांच्या निवडणुका वेळेत होणार आहेत.
दरम्यान मागील दोन वर्ष कोरोनामुळे (Corona) कोणतीही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली नाही. मात्र त्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मुदत संपलेल्या राज्यातील बाजार समित्यांची निवडणूक घेण्याचे आदेश सप्टेंबर महिन्यात दिले होते. 29 जानेवारी 2023 रोजी बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी मतदान घेण्याचे ठरवून त्या अगोदर मतदार याद्या तयार करणे, प्रारूप यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती घेणे, व अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम जिल्हा उपनिबंधकाच्या अखत्यारीत करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील नाशिकसह चौदा बाजार समित्यांचा कार्यक्रम घोषित झाल्याने इच्छुकांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात काही विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या निवडणुका बाकी असल्याने सहकार प्राधिकरणाने निवडणुकांना स्थगिती दिली होती.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत सहकार विभागाने 20 डिसेंबर पर्यंत स्थगिती दिली होती. मात्र तत्पूर्वी 16 डिसेंबर रोजीच स्थगिती उठविण्यात आल्याने सहकार विभागाने निवडणूक घेण्याची तयारी चालवली आहे. दरम्यान जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्या मतमोजणी होणार आहे, असे असताना सदानंद नवले यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन ग्रामपंचायतच्या निवडणुका सुरू असल्याने नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती मिळावी अशी विनंती केली. याच दरम्यान न्यायालयात कोल्हापूर जिल्ह्यातूनही याचिका दाखल असल्याने न्यायालयाने कोल्हापूर व नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीला 15 मार्चपर्यंत स्थगिती देत असल्याचा आदेश जाहीर केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळा, घोटी, मालेगाव, दिंडोरी, लासलगाव, नाशिक सुरगाणा, नांदगाव, सिन्नर, पिंपळगाव, चांदवड, मनमाड, येवला व कळवण असे 14 बाजार समिती यांची मतदारांची अंतिम यादी सात डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या बाजार संतीच्या निवडणुकांसाठी शुक्रवारपासून नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहेत. आता नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ या तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती मिळाल्यामुळे नाशिक वगळून अन्य 13 बाजार समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे.