Nashik News : नाशिक महापालिकेचा झगमगाट, स्वातंत्र्य दिनाला तब्बल 14 लाखांची 'लायटिंग'
Nashik News : नाशिकच्या महापालिकेवर करण्यात आलेल्या रोषणाईसाठी (Lighting) तब्बल 14 लाखांचा खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) महापालिकेतील उधळपट्टीचा कारभार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Swatantryacha Amrit Mahotsav) नाशिकच्या महापालिकेवर करण्यात आलेल्या रोषणाईसाठी (Lighting) तब्बल 14 लाखांचा खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा अहवाल पाहिल्यानंतर मनपा आयुक्तांनी (Nashik NMC) देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नाशिक (Nashik) महापालिकेने देखील नागरिकांना ध्वज वितरण यासह पालिकेवर विद्युत रोषणाई (Lighting) तसेच विविध सांस्कृतिक राबवण्यात आले. नाशिक पालिकेत (Nashik NMC) ध्वज खरेदीचे 36 लाखांचे बिल देखील वादात सापडल्यास होते. दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनावर करण्यात आलेल्या नऊ दिवसाच्या विद्युत रोषणाईसाठी तब्बल 14.10 लाख रुपयांची बिल काढण्याची तयारी केली आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या पटलावर आल्यानंतर आयुक्त तसा प्रशासक डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार देखील आश्चर्य चकित झाले. त्यांनी या बिलाची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश विद्युत विभागाला दिले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईवरील खर्च संशयाच्या सापडला आहे भोवऱ्यात सापडला आहे. भद्रकाली इंटरप्राईजेस यांच्या माध्यमातून हे काम करून घेण्यात आले. मंगळवार झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या संदर्भातील 14 लाखांचा प्रस्ताव कार्य तर मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. परंतु हा खर्च पाहून आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विद्युत रोषण्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च कसा असेल असा प्रश्न उपस्थित करीत यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती का? अशा प्रश्न उपस्थित केले. यावेळी विद्युत रोषण्यासाठी वार्षिक निविदा मंजूर असल्याचा दावा विद्युत विभागाचे अध्यक्ष अभियंता उदय धर्माधिकारी यांनी केला.
महापालिकेत प्रशासकीय राजवट
सद्यस्थितीत गेल्या सहा महिन्यापासून नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजभर सुरू आहे. मात्र प्रशासकीय राजवटीतही गैरप्रकार यांची मालिका थांबतात थांबत नसल्याचे चित्र आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन करण्यात आलेल्या विद्युत रोशनेवरील खर्च यंदा संशय निर्माण करणारा ठरला आहे. अमृत महोत्सवानिमित्त महापालिका मुख्यालयावर करण्यात आलेल्या रोषणाईसाठी जवळपास 14 लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
लायटिंगसाठी 14 लाखांचा खर्च
नऊ दिवसांच्या विद्युत रोषणाई करतात तब्बल 14 लाख 10 हजार 375 रुपये खर्चाचा प्रस्ताव कार्य तर मंजुरीसाठी सादर झालेला पाहून आयुक्त तथा प्रशासक डॉ.चंद्रकांत पुलगुंडवार हे देखील आश्चर्यचकित झाले. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन विद्युत रोषणाईसाठी इतका मोठ्या प्रमाणावर खर्च कसा करण्यात आला असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर विद्युत रोषणाई करता वार्षिक निविदा दर मंजूर असल्याचा दावा विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी केला. या संदर्भातील माहिती सादर करण्याची सूचना मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत.