Cyber Crime : नाशिककर! ऑनलाईन पेमेंट करताय, गुन्हेगारांपासून सावध व्हा, सायबर पोलिसांचा अलर्ट
Cyber Crime : नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीने (Cyber Crime) डोके वर काढले असून नाशिक सायबर पोलिसांनी (Nashik cyber Police) विशेष मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे.
Cyber Crime : नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीने डोके वर काढले असून त्या संदर्भात नाशिक सायबर पोलिसांनी (Nashik cyber Police) विशेष मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारीचे (Cyber Crime) प्रमाण आटोक्यात असले तरी नवीन फंडे हेरून गुन्हेगार नागरिकांना गंडा घालत आहे. यामध्ये चुकीच्या क्रमांकावरून फोन करून आर्थिक फसवणूक करण्यास ही पेमेंटच्या (Online Payment) माध्यमातून दंड घालण्यात येत आहे. यामध्ये गणेश उत्सवाच्या कालावधीत ही व्यवहार वाढल्यास गुन्ह्यात वाढ न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner) यांनी गुन्हे शाखेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
निर्बंध मुक्त वातावरणात गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा होत असल्याने बाजारपेठेला उधाण आले आहे. शिवाय पेमेंटची सवय सर्वांना असल्याने व्यवहार वाढल्या असून त्यातून सायबर गुन्हे घडण्याची शक्यता आहे त्यामध्ये गणेश मूर्ती प्रसाद लाइट्स या विक्रीसहीत इतर कारणातून आर्थिक फसवणुकीची शक्यता असल्याचा अलर्ट सायबर पोलिसांनी दिला आहे गणेशोत्सवाच्या धुमधडाक्यात गुन्हेगारांपासून सावध राहा असा सल्ला देत प्रबोधनाला पोलिस आयुक्तालयाने प्रारंभ केला आहे.
त्यानुसार उपायुक्त संजय बारकुंड सहाय्यक आयुक्त वसंत मोरे, सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान या मोहिमेत शहरातील संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन सायबर पोलिसानी केले आहे. अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट व्हाट्सअप कॉल स्वीकारू नये अज्ञातांना कधीही खाजगी माहिती अथवा बँकेची माहिती देऊ नका, मुळात गरज नसलेले ॲप डाऊनलोड न करता हे सायबर गुन्हे रोखण्यास मदत करेल, अशी माहिती उपायुक्त गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली आहे.
फसवणुकीचे प्रकार
अलीकडच्या काळात बऱ्याच कुरिअर कंपन्या व इतर आस्थापना यांचे मनावर कस्टमर केअर असेल नंबर असलेल्या पोस्ट जाहिराती गुगल सर्च इंजिनवर सायबर गुन्हेगारांकडून अपलोड करण्यात आले आहेत. सायबर गुन्हेगार गुगलवर त्यांचा नंबर एडिट केला असता सदर नंबरवर नागरिकांनी संपर्क साधल्यावर तो नंबर सायबर गुन्हेगारांना लागतो आणि या माध्यमातून आपली फसवणूक होण्याची शक्यता असते.
तर दुसऱ्या प्रकारात सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तात्काळ फोन द्वारे एसएमएस पाठवून गरजू व्यक्तींना कमीत कमी प्रोसेस द्वारे विना कागदपत्र द्वारे तात्काळ ऑनलाईन लोन देणारे ॲप सध्या फसवणूक करत आहेत. त्यानंतर विज बिल खंडित करण्याची भीती दाखवणारे मेसेज पाठवून फसवणूक करण्यात आल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. सायबर गुन्हेगारांनी एसएमएस पाठवून तुम्ही वीज बिल भरले नाही, आज रात्री साडेनऊच्या सुमारास तुमची लाईट कट होणार आहे, दिलेल्या नंबर वर संपर्क करा असा, मेसेज येतो, काही नागरिक घाबरून एसएमएस मधील नंबर वर संपर्क साधतात व याच संपर्काच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार त्यांना बोलण्याचा झासा देऊन रक्कम लंपास करतात.
तर अनेकदा भारतीय सैन्य दलात नोकरीस आहे असे भाषण फसवणूक केली जाते ओएलएक्सच्या माध्यमातून मी भारतीय सैन्यात नोकरीच आहे माझी गाडी विकणे किंवा फळे भाजीपाला क्लास नर्सिंग सेवा पाईपलाईन धान्य रितीय अन्य वस्तूंची मोठ्या प्रमाणात ऑर्डर देणे आहे अशा प्रकारच्या मोठमोठ्या ऑर्डर देण्याच्या बहनांनी सैनिक आयकार्ड कॅन्टीन कार्ड ची ओळख दाखवून नागरिकांचा विश्वास संपादन करून ऑनलाईन व्यवहारातून फसवणूक केली जाते.
सायबर गुन्ह्यापासून वाचण्यासाठी घ्यावयाची काळजी
अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नये, अनोळखी व्यक्तीच्या नंबर वरून व्हिडिओ कॉल आल्यास स्वीकारू नये. लॉटरी लागली तुमचा मोबाईल नंबर लकी नंबरला बक्षीस लागले आहे, अशा भूलथापांना बळी पडू नये. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ब्लॉक होईल, एटीएम बँक खाते, केवायसी अपडेट करण्याचे कॉल ला प्रतिसाद देऊ नये. ओएलएक्स किंवा सैनिक म्हणून एखादे वाहन किंवा घरातील गृहपयोगी वस्तू विकत असल्याचा फोन करत असेल किंवा सैनिक म्हणून सेवा फोनवरून मागत असेल तर ऑनलाईन व्यवहार करू नये. फोनवर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, यूपीआय पिन, ओटीपी, बँक खाते नंबरची माहिती अनोळखी व्यक्तीला फोनवर देऊ नये. सायबर फसवणूक झाल्यास सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.