Nashik Crime : साडीच्या पदरानं गळा आवळून 'प्रेमा'नं पत्नीला संपवलं, शेतमजुराच्या संसाराला 'संशयाचं' ग्रहण
Nashik Crime : निफाड तालुक्यात (Niphad) चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून (Murder) केल्याची घटना घडली आहे.
Nashik Crime : निफाड तालुक्यात (Niphad) खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली असून चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शेतमजूराने पत्नीची गळफास देऊन हत्या (Murder) केल्याचे उघड झाले असून, लासलगाव पोलिसांनी (Lasalgaon Police) फरारी संशयित पतीला अवघ्या तासाभरात ताब्यात घेतले आहे.
नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात गुन्हेगाराची फोफावत चालली असून शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात वारंवार गुन्ह्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द येथील अंबादास शंकर संभेराव यांच्या शेतातील पॉलिहाउसमध्ये मध्य प्रदेशातील शेतमजूर कामास होते. त्यापैकी आशा प्रेमा वासकले हीचा काल सकाळी मृतदेह आढळून आला. याबाबत पोलीस पाटील रतन भवर यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पथकाने तातडीने मानोरी येथे धाव घेतली. तिचा पती प्रेमा वासकले याने तिच्याच साडीने गळफास देऊन हत्या केली असून, तो फरारी असल्याचे मृताचे मामा ध्यानसिंग मेथू चव्हाण याने सांगितले.
निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द येथे आशा वासकेले आणि प्रेमा वासकेले हे दाम्पत्य कामासाठी वास्तव्य करत होते. प्रेमा व आशा हे दाम्पत्य मूळचे मध्य प्रदेशातील खारगन जिल्ह्यातील रहिवासी असून काम धंद्यासाठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात वास्तव्यास होते. दोघेही शेतात मोलमजूरी करून आपली उपजीविका करत होते. मात्र प्रेमाच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले प्रेमा पत्नीच्या चरित्रावर संशय येऊ लागला.
या संशयितांतून त्यांनी पत्नीला आधी मद्य पाजले. मग नशेत त्याने पत्नीची गळफास लावून हत्या केली. पत्नीचे हत्या केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाला. दुसऱ्या दिवशी दांपत्य शेतावर आले नाही. म्हणून शेतकरी पाहण्यासाठी आला असता समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. शेतकऱ्याने तात्काळ या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळतात लासलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक एल. के. धोक्रट, नाईक संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर, काॅन्स्टेबल प्रदीप आजगे, देवीदास पानसरे यांचे तपास पथक तयार करून रवाना केले. यवे ला पोलीस ठाण्याचे अंमलदार आबा पिसाळ यांच्या मदतीने यावेळी शहरातून संशयित पतीस अवघ्या तासाभरात ताब्यात घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धोक्रट, संदीप शिंदे व औदुंबर मुरडनर तपास करीत आहेत.