एक्स्प्लोर

Nashik NCP : नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वाद, शरद पवार समर्थकांकडून घोषणाबाजी, तर भुजबळ समर्थक कार्यालयात 

Nashik Political News : अखेर नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वादाला तोंड फुटले असून राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

Nashik Political News : अखेर नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वादाला तोंड फुटले असून शहरातील मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर (Nashik NCP Office) मोठा गोंधळ निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून दोन्ही गटाकडून मोठी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्याचबरोबर परिसरात गोंधळाचे वातावरण असून पोलिसांकडून गोंधळ बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचा परिणाम आज सकाळपासूनच नाशिक (Nashik NCP) राष्ट्रवादीच्या गोटात दिसून येत आहे. कालपासून छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेले आहेत. दुसरीकडे सायंकाळी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर चांगलाच गोंधळ निर्माण जल्याकह दिसून आले. मात्र राष्ट्रवादी भवन कार्यालयात मात्र शुकशुकाट होता. मात्र आज सकाळपासून हे चित्र बदललं आणि नाशिकच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे चित्र समोर आले. त्यानुसार सकाळी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्यांकडून कार्यालयावर ताबा घेण्यात आला. तर दुपारी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून बैठक होणार होती. या पार्श्वभूमीवर थोड्यावेळा पूर्वी शरद पवार गटाचे नेते जमत होते. मात्र तत्पूर्वीच भुजबळ गटाचे समर्थक कार्यालयात उपस्थित होते. गोंधळ होऊ नये या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळपासूनच बंदोबस्त होता. मात्र दुपारनंतर शरद पवार (Sharad Pawar) समर्थक देखील पोहचल्याने गोंधळाची स्थिति निर्माण झाली आहे.

अजित पवार, छगन भुजबळ आणि शरद पवार समर्थक एकत्र आले असून वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करण्यात येत असून शरद पवार गटाच्या समर्थकांना कार्यालयात जाऊ दिले जात नसल्याने वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता कार्यालयाबाहेर गोंधळ सुरु असून नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार देखील उपस्थित आहेत. माजी नगरसेवक गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड इथे समर्थकांसह उपस्थित आहेत. गजानन शेलार हे शरद पवार यांच्या बाजूनं उभे आहेत तर आव्हाड चर्चा करून मार्ग काढा, या भूमिकेमध्ये आहे. सद्यस्थितीत पोलिसांचा मोठा फौजफाटा असून दंगा नियंत्रण पथक जमावाला बाजूला करत असल्याचे चित्र आहे. 

राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वाद

एकीकडे भुजबळ समर्थकांनी कार्यालयावर ताबा घेतला असून शरद पवार समर्थकांना आत जाऊ दिले जात नाही. त्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शरद पवार गटाची आज दुपारी बैठक होती, मात्र अशातच भुजबळ समर्थक कार्यालयात असल्याने आणि पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आल्याने जाऊ दिले जात नसल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. सद्यस्थितीत गोंधळ उडाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दोन्ही गटातील नेते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. बैठक होणार, कार्यालयात नाही तर इतरत्र घेऊ, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत गोंधळ सुरूच असून हा तिढा कुठपर्यंत जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget