एक्स्प्लोर

Nagar Manmad Highway : आंदोलने-निवेदने फेल, नगर-मनमाड महामार्गाचं शेवटी श्राद्ध घातलं! तरीही प्रशासन ढिम्मचं

Nagar Manmad Highway : नगर-मनमाड महामार्ग दुरुस्तीसाठी स्थानिकांनी शेवटी रस्त्याचं श्राद्ध घातलं.

Nagar Manmad Highway : अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या (Nagar-Manmad Highway) रस्त्याच्या दुरावस्थेमुळे (Road Damage) गेल्या काही वर्षात शेकडो प्रवाशांना आजवर आपला जिव गमवावा लागला असून रास्ता दुरुस्तीसाठी  अनेकदा आंदोलनासह निवेदने दिली गेली. मात्र रस्ता आजही पूर्ण दुरुस्त झाला नाही. सरकार असो वा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आतापर्यंत जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीकांनी करत थेट महामार्गावर दशक्रियाविधी घालत अनोख्या पद्धतीने निषेध (Protest) केला. 

गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झाली आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या नगर-मनमाड महामार्गावर महाकाय खड्डे (Potholes) पडल्याने साईभक्तांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता वर्ग होऊनही या महामार्गाची टेंडर प्रक्रिया रखडली आहे. तर काही महिन्यांपूर्वी ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने महामार्ग खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. शिवाय अहमदनगर मनमाड महामार्ग केंद्राकडे वर्ग झाला असून कामाची निविदा निघाली. त्यानंतर कामही सुरू झाले होते. मात्र ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून अनेकदा अपघात होऊन प्रवाशांना जिव गमवावा लागत असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान राहुरी फॅक्टरी ते राहुरी या सहा किमी रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने गेल्या दोन तीन महिन्यांत अनेकांनी आपला जिव गमावला आहे. या सहा किमीची एकेरी वाहतूक बंद करून रस्ता दुरूस्त केला जावा ही मागणी करत सरकार विरोधात लक्षवेधी आंदोलन करण्यात आल. विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज प्रशासना विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी दशक्रिया विधी कार्यक्रम आयोजित करून प्रशासनाला जाब विचारला. महामार्गावर ज्या ठिकाणी जास्त अपघात होता आहेत. त्या ठिकाणी चक्क एखाद्या व्यक्ती प्रमाणे प्रशासना विरोधात दशक्रिया विधी घालत निषेध व्यक्त करण्यात आला. नगर मनमाड रोडवर होणाऱ्या अपघातांविषयी माहिती देण्यासाठी कीर्तन ठेवण्यात येऊन यावेळी आंदोलन कर्त्यांकडून विधिवत पूजा करण्यात आली. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी मुंडनही केले. यानंतर देखील प्रशासनाने तातडीने कामाला सुरवात करून मार्ग सुकर करावा अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. 

अनेकदा आंदोलन मात्र प्रशासन ढिम्म 
 गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झाली आहे. नाशिकसह शिर्डी या दोन महत्वाच्या शहरांना जोडला जाणारा रस्ता असून वाहतुकीचीही वर्दळ असते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या नात्या कारणाने हा महामार्ग चर्चेत राहिला आहे. यापूर्वी देखील स्थानिकांनी आंदोलनाचा भडीमार केला असला तरी अद्याप रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे. काही महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महामार्गावर असलेल्या खड्ड्यात बसून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं होत. नगर मनमाड महामार्गावरून प्रवास करण्याची विनंती या पत्राच्या माध्यमातून गडकरी यांना करण्यात आली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget