Nashik News : सून झालं रान सारं! नाशिक जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या रखडल्या, अवघी 08 टक्के पेरणी
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात पावसाअभावी आतापर्यंत 08 टक्केच पेरण्या (Sowing) झाल्या असून, अनेक भागांत पेरण्या रखडल्याचे चित्र आहे.
Nashik News : नाशिक शहरात (Nashik City) पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली तर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये पावसाने हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात आतापर्यंत 08 टक्केच पेरण्या झाल्या असून, अनेक भागांत पेरण्या रखडल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात पावसाला सुरुवात होऊन वीस-एकवीस दिवसांचा कालावधी लोटला असून अनेक भागात पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळे जून महिना संपत आला असून देखील जिल्ह्यात अवघ्या 8.89 टक्के तर नाशिक विभागात केवळ 19.89 टक्के इतक्या खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.नाशिक जिल्ह्यात खरिपाचे उद्दिष्ट 6 लाख 65 हजार 582.20 हेक्टर तर विभागात 21 लाख 91 हजार इतके ठेवण्यात आले .
जूनमधील मृग नक्षत्र संपून सध्या आर्द्रा नक्षत्र सुरू असून जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस होत आहे. यामुळे पेरण्यांना वेग आला असला तरी उशिरा आलेल्या पावसामुळे पेरण्यांना उशीर झाला आहे. 28 जूनपर्यंत जिल्हयात खरिपाच्या अवघ्या साडेआठ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी जूनमध्ये 15 टक्के पेरण्या झाल्या हाेत्या. मागील वर्षी जून महिन्यामध्ये कमी पाऊस होऊनही महिन्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्या सुरू झाल्या होत्या.
जिल्ह्यात मका व बाजरी पिकाला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. पेरण्यांना सध्या वेग आला असला तरी अद्याप सर्वदूर समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे सोयाबीनच्या पेरण्यांना पाहिजे तसा वेग आल्याचे दिसत नाही. यावर्षी अन्नधान्य पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र 5 लाख 30 हजार 488 सर्वसाधारण क्षेत्र निश्चित केले असून त्यापैकी 46 हजार 133 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 8 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात मकाच्या 17 टक्के पेरण्या झाल्या आहेत. मकाचे दोन लाख 9 हजार 497 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून 35641 हेक्टरवर पेरण्यात झाल्या आहेत. या शिवाय कडधान्याची 3.28 टक्के म्हणजे 2779 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तेलबियांची 1161 हेक्टर म्हणजे केवळ एक टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर जिल्ह्यात येवला, नांदगाव व मालेगाव तालुक्यात कपाशीची पेरणी होत असते. आतापर्यंत कपाशीची 28 टक्के म्हणजे 11 हजार 457 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
आतापर्यंत 08 टक्केच पेरण्या
नाशिक शहरात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली तर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये पावसाने हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात आतापर्यंत 08 टक्केच पेरण्या झाल्या असून, अनेक भागांत पेरण्या रखडल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असूनजून महिना उलटला तरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे.