Nashik Ganeshotsav : एकीकडे गणेश विसर्जन सुरु होत, दुसरीकडं माय लेक नदीत उडी घेत होते, तेवढ्यात....
Nashik Ganeshotsav : नाशिकच्या (Nashik) सायखेडा (Saykheda Police) येथे माय लेक जीवन संपविण्याच्या तयारीत असताना स्थानिक पोलिसांनी सतर्कता दाखवत या दोघांचे प्राण वाचविले आहे.
Nashik Ganeshotsav : एकीकडे नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणुकीची धूम सुरु असताना दुसरीकडे नाशिकच्या सायखेडा (Saykheda Police) येथे माय लेक जीवन संपविण्याच्या तयारीत असताना स्थानिक पोलिसांनी सतर्कता दाखवत या दोघांचे प्राण वाचविले आहे. त्यामुळे पोलिसांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
नाशिकमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीला उधान आले आहे. ढोल ताशांच्या निराळात वातावरण अगदी चैतन्यमय झाले असून लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी अख्ख नाशिक एकवटल आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातही गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहाचे वातावरण आहे. अशातच सायखेडाजवळील ब्राम्हणवाडे येथील कौटुंबिक समस्येला कंटाळत आत्महत्या करायला निघालेल्या महिलेला सायखेडा पोलिसांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळत अनंत चतुर्दशीला सायखेडा पोलिसांच्या रुपात विघ्नहर्ता आल्याचे दिसून आले.
अनंत चतुर्दशीनिमित्त सकाळी सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी हे गोदावरीनदी वरील सायखेडा पुलावर बंदोबस्ताची पाहणी करत असतांना पुलाच्या बाजूने निफाड तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील पल्लवी उर्फ ताई गोरख माळी ही विवाहित महिला आपल्या मुलगा रोहितसह पळत आली.आणि मुलाला काखेत घेत मुलासह नदीत उडी मारणार. तोच सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी महिलेकडे बघत उडी मारू नको म्हणत धाव घेतली. त्याच वेळी पुलावर प्रवास करणारे अशपाक शेख, भाऊसाहेब ससाणे, सद्दाम शेख हे थांबत महिला पोलीस कर्मचारी उर्मिला काठे यांच्या मदतीला येत विवाहितेला आत्महत्या करण्यापासून थांबवलं.
यावेळी पोलिसांनी विवाहित महिलेची आस्थेने विचारपूस करत आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत तिचे मनपरिवर्तन केले. मूळची ब्राम्हणवाडे येथील असल्याचे सांगत कौटुंबिक समस्येतुन आत्महत्या करत होते असल्याचे सांगितले. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांच्यातील भाऊ जागा जागा होत महिलेसह मुलास नवीन कपडे देत खाऊ भेट दिला. दरम्यान महिलेच्या चेहऱ्यावर अनंत चतुर्दशीच्या दिवशी पी वाय कादरी यांच्या रुपात विघ्नहर्ता धावून आल्याचे जाणवले. दरम्यान सायखेडा पोलिसांच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे.
पोलीसांच औदार्य