एक्स्प्लोर

Nashik trimbakeshwer : त्र्यंबक प्रकरणाची गृहमंत्री फडणवीसांकडून दखल, एसआयटी चौकशीचे आदेश, मात्र पोलीस म्हणाले.... 

Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेसंदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwer Mandir) प्रवेश करण्यासाठी विशिष्ट जमावा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे प्रवेश करण्याचा वाद निरर्थक असल्याचा दावा पोलिसांनी केलेला असून हा वाद गैरसमजातून झाल्याचे नाशिक (Nashik) ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी स्पष्ट केले. 

राज्यात मागील दोन दिवसांपासून तणावाचे वातावरण असून अशातच त्र्यंबकेश्वर शहरातील (Trimbakeshwer Mandir) त्र्यंबकेश्वर मंदिरात काही लोकांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यावरुन देखील राजकीय पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. यावरून देवस्थांकडून पोलिसांना पात्र पाठवून घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र काल सायंकाळी उशिरा पोलिसांनी याबाबत सलोखा बैठक घेत गैरसमजातून हा वाद झाल्याचे सांगितले. तर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असून कारवाई करण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

साधारण 13 मे रोजीची ही घटना असून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांची रोजच दर्शनासाठी गर्दी होत असते. त्या दिवशी उत्तर दरवाजाच्या दिशेने जात मंदिरात प्रवेश करायचा असल्याचे जमावाने सांगितले. मात्र उपस्थित सुरक्षारक्षकांनी त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी आणि पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला होता. मात्र या घटनेनंतर दोन दिवसांनी त्र्यंबक मंदिर प्रशासनाने पोलिसांना पत्रव्यवहार करत घटनेच्या चौकशीची मागणी केली. दुसरीकडे या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती. 

हा वाद गैरसमजातून

तर दुसरीकडे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ घटनेसंदर्भात दोन्ही बाजूंची सलोखा बैठक घेत मुद्दा सोडविल्याचे म्हटले आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप म्हणाले की, मंदिरात प्रवेश करण्याचा वाद निरर्थक असून हा वाद गैरसमजातून झाला आहे." त्र्यंबकेश्वर मंदिरात उत्तर दरवाजातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सलोखा बैठक घेतली आणि वादावर पडदा टाकला. ते म्हणाले की, धूप दाखवण्यासाठी काही तरुण मंदिराच्या गेटवर आले होते. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. कारण मंदिराची दर्शनाची वेळ देखील संपलेली होती. हे सगळं झाल्यानंतर गेटवरुन ते परत गेले. संबंधित प्रवेश करणाऱ्या लोकांनी देखील हे मान्य केलेले असून यात कुणाला जर ऑब्जेक्शन असेल तर आम्ही मंदिराकडे जाणार नाही, असेही ते म्हणाले असल्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले. 

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. इतरधर्मीय मंदिरात धूप दाखवण्यासाठी मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी आग्रही होते, मात्र त्यांना सुरक्षारक्षकांनी मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मंदिराच्या उत्तर दरवाजातून मंदिर परिसरात प्रवेश करुन तिथूनच देवाला धूप दाखवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ जुना असण्याची शक्यता असून त्याबाबत पोलीस तपासात काय निष्पन्न होते? हे बघणे महत्त्वाचे आहे. 

नितेश राणे म्हणाले...

तर दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्ती चादर टाकण्याचा प्रयत्न झाला. हट्ट धरतात. पहिलं महाराजांच्या गडकिल्ल्यावर अतिक्रमण सुरु केलं. आता तर धार्मिक स्थळाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरु झाला असून उद्या घरात देखील येतील, असेही ते म्हणाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget