Nashik Saptshrungi Gad : सप्तशृंग गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस, सहा ते सात भाविक जखमी, प्रदक्षिणा मार्गही खचला!
Nashik Saptshrungi Gad : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसामुळे (Heavy Rain) सहा ते सात भाविक जखमी झाले आहेत.
Nashik Saptshrungi Gad : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसामुळे भाविक भयभीत झाले असून या अचानक आलेल्या पावसामुळे सहा ते सात भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पाहणी करण्याच्या सूचना करण्याची आल्याचे समजते.
नाशिक शहरासह जिल्ह्यात तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर सह सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस कायम आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यास रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान वाणी जवळील सप्तशृंगी गडावर अचानक ढग फुटी सदृश्य पाऊस आल्याने भाविकांची तारांबळ उडाली आहे. यात सहा ते सात भाविक जखमी झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील साडे तीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांचा मोठा राबता असतो. अशातच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक गावातील संपर्क तुटला आहे. तर थोड्या वेळापूर्वी गर्दीचे ठिकाण असलेल्या सप्तशृंगी गावात अचानक झालेल्या ढगफुटीमुळे भाविकांना सुचेनासे झाले. यामध्ये सहा ते सात भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान मंदिराच्या वरील बाजूने अतिवृष्टी होऊन सर्व पुराचे पाणी पायऱ्यांनी खाली उतरले. यावेळी उतरली पायरी असल्याने चढ मार्गावर पूर परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पुराबरोबर मोठ्या संख्येने दगड गोटे, माती, झाडांचे रोपटे देखील वाहून आल्यानें मंदिरात जात असलेल्या भाविकांची धावपळ उडाली. घटनेत सात भाविकांना किरकोळ इजा झाली असून त्यांना उपचारासाठी धर्मार्थ आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय घटनास्थळी सप्तश्रुंगी देवी ट्रस्ट चे अधिकारी उपस्थित असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम आणि की कमांडो फोर्सने विशेष परिश्रम घेऊन भाविकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
जिल्ह्यास रेड अलर्ट
तीन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यास (Nashik District) धुवांधार पावसाने झोडपून काढले आहे. सर्वत्र पावसाने (Heavy Rain) हाहाकार केला असून नदी नाल्याना पूर आला आहे तर अनेक भागात पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भाग असलेला त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस कायम असून आता पर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील धारण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून 10 हजार क्युसेकने विसर्गही करण्यात येत आहे.