Maharashtra Political News : भुजबळ-कांदे वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिटवणार, भर सभागृहात सांगितलं 'आपण बघून घेऊ'
Maharashtra Political News : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि सुहास कांदे (Suhas Kande) वाद आम्ही स्वतः मिटवू, 'आपण बघून घेऊ' असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनात सांगितले.
Maharashtra Political News : छगन भुजबळ आणि सुहास कांदे वाद आम्ही स्वतः मिटवू, त्यामुळे दोघांनीही टेन्शन घ्यायचं नाही, 'आपण बघून घेऊ' असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनात सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आज पहिले भाषण करीत कुठे फटकारे, कुठे विनोद तर कुठे अनेक तीर यावेळी त्यांनी सोडले.
आजच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृह गाजवलं. यावेळी असं वाटलं नाही कि, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पहिले भाषण होते. यावेळी त्यांनी ठाण्यात एक कार्यकर्ता असल्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यतचा परखड प्रवास त्याची सभागृहात मांडला. तर नुकत्याच त्यांनी शिवसेनेतुन बंडखोरी केली. ती किस्साही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. त्याचबरोबर विरोधकांना नाव न घेता कांही टोचले. हे सर्व सांगताना त्यांनी छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांचा वादाबाबत स्पष्टीकरण दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले कि, मी जरी मुख्यमंत्री म्हणून असलो तरी आपण सर्व एकाच आहोत, तुमची जी कामे असतील ती आपण करून घेऊ. जयंत पाटील यांना उद्देशून म्हणाले कि, जयंतराव जलसंपदा मंडळातील काही कामे रखडली असतील, ती सांगा आपण मार्गी लावू, तसेच ते पुढे म्हणाले, छगन भुजबळ यांना देखील त्यांनी यावेळी आश्वासन दिले. ते म्हणाले , भुजबळ साहेब, आपण सुहास कांदेना साभाळूया, काय असेल ते आपण बघू घेऊ, अशा शब्दात भुजबळ कांदे वादावर त्यांनी पडदा टाकला.
भजूबाला कांदे वाद
नांदगावमधील पूरस्थितीबाबत झालेल्या बैठकीत निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता. पालकमंत्री भुजबळ यांनी निधीचा वाटप नीट केलेला नाही, असे कांदे यांचे म्हणणे होते. कोट्यवधींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याप्रकरणी आमदार कांदे यांनी उच्च न्यायालयात दावा देखील दाखल केला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या कामांना ब्रेक
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला झटका दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ याना चागंलाच दणका दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या 567 कोटींच्या कामांना ब्रेक देऊन इतक्या घाईत कामांना मंजुरी कशासाठी असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला आहे.