Nashik Chhagan Bhujbal : राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही, छगन भुजबळांचा सवाल
Nashik Chhagan Bhujbal : रत्नागिरी येथील सभेत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याला छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) प्रत्युत्तर दिले आहे.
Nashik Chhagan Bhujbal : शरद पवार (Sharad Pawar) हे नेहमी शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) हे फुले, शाहू, आंबेडकरांचे नांव का घेत नाही, असा खरमरीत सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत शरद पवार यांच्याबाबत विधान केले की, शरद पवारांच्या तोंडून कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात नाही. यावर छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी (Ratnagiri) येथे सभा घेतली. राज ठाकरेंनी आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar NCP) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, शरद पवारांच्या तोंडून कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं (Shiwaji Maharaj) नाव घेतलं जात नाही. यावर भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील प्रत्येक घटकाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली, त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर 9Dr. Babasaheb Ambedkar) यांनी सामाजिक क्रांतीच फार मोठं काम केलं. म्हणून शरद पवार म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहे. अगदी प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील बरचसं काम फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर केलं आहे. त्यामुळे त्याचं नाव घेण्यात वावगे काय आहे, शरद पवार हे नेहमी शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, मात्र राज ठाकरे हे फुले,शाहू,आंबेडकरांचे नांव का घेत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
रत्नागिरी येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याविषयी वक्तव्य केलं. त्यानंतर आज नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत मी गेल्या 91 सालापासून आहे. पवार हे अनेक भाषणांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात. तसेच त्यांच्या इतिहासाची उजळणी देखील ते करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यात त्यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी पवार यांनी स्पष्ट सांगितले की, महाराष्ट्र म्हटल की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतल जात. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील सर्व घटकांचे आहे.
महापुरुषांचे सामाजिक क्रांतीमध्ये मोठ योगदान
महाराष्ट्रात असा एकही घटक नाही जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राज्यात फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारखे समाज सुधारक होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वव्यापी होते. त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेतलं असे त्यांनी यावेळी सांगितले. फुले, शाहू, आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीमध्ये मोठ योगदान दिलं. म्हणून पवार यांनी म्हटल आहे की, संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे फुले, शाहू, आंबेडकर यांना मानतात.
पुस्तके वाचली पाहिजेत....
दिल्लीत आपले जे ही नेते काम करतात त्यांना दिल्लीत मराठा नेते असे म्हटले जाते. अगदी तो नेता कुठल्याही समाजाचा असला तरी अस उत्तर पवार यांनी राज ठाकरे यांना दिल असल्याची आठवण त्यांनी राज ठाकरे यांना करून दिली. प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून मांडले. ही पुस्तके माझ्या संग्रही आहे, ती पुस्तके मी वाचतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत फुले, शाहू आंबेडकर यांचे नाव घेतले तर त्यात बिघडत कुठे अशी टिपणी देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केली.