एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : 'सगळे कपडे काढून घ्यायचे अन फक्त लंगोट द्यायची' इंधन दर कपातीवरून भुजबळांनी लगावला टोला 

Chhagan Bhujbal : 'एखाद्याचे सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायची' अशी पेट्रोल व डिझेलची दरकपात (Petrol Diesel Price Decreased) असल्याची टीका छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. 

Chhagan Bhujbal : भाजपच्या (BJP) केंद्रातील सरकारपेक्षा (Central Goverment) राज्यातील सरकार अधिक हुशार निघाले आहे. कारण एकीकडे राज्यसरकारने सर्व वस्तूंवरील जीएसटी (GST) 5 टक्क्यांनी वाढविला, वीज बिल वाढवलं, एलपीजी 50 तर सीएनजी 4 रुपयांनी महाग केलं आणि दुसरीकडे केवळ 5 रुपयांनी पेट्रोल आणि 3 रुपयांनी डीझेल कमी (Petrol Diesel Rate) केले. म्हणजे हे सरकार किती हुशार आहे हे कळते असा चिमटा काढत एखाद्याचे सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायची अशी पेट्रोल व डिझेलची दरकपात असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. 

देशात ओबीसींची (OBC Population)) लोकसंख्या ही 54 टक्के असून ओबीसींच्या हक्काचे 27 टक्के आरक्षण ओबीसींना (OBC Reservation) मिळालेच पाहिजे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) कमी होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर आहे. कोरोनामुळे अद्यापही देशात जनगणना होऊ शकली नाही. आता देशात जनगणना सुरु करून त्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करून घ्यावी अशी मागणी केली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. त्यांनी आज नाशिक येथील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, देशात मंडल आयोग लागू झाला त्यावेळी ओबीसींची संख्या ही 54 टक्के होती. त्यानंतरच्या काळात कुणबी मराठासह 100 हून अधिक जाती या ओबीसीत समाविष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच ओबीसींची संख्या ही 54 टक्क्यापेक्षा जास्त असणार आहे. ते म्हणाले की, बांठिया आयोगाच्या कार्यपद्धतीला आम्ही विरोध केला होता. कारण आयोगाच्या वतीने आडनावरून माहिती गोळा केली जात होती. यातून ओबीसींची खरी माहिती समोर येणार नाही. त्यामुळे याबाबत आयोगाला कळविण्यात देखील आले होते. ओबीसी आयोगाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चार गावांमध्ये चक्क ओबीसींची लोकसंख्या शून्य टक्के असल्याचे अहवालात म्हटले होते. यावर आमच्या कार्यकर्त्यांनी उदाहरणादाखल प्रत्यक्ष दोन गावांमधील लोकसंख्येची पडताळणी केली असता त्यातील एका गावचे सरपंच ओबीसी तर दोन ग्रामपंचायत सदस्य ओबीसी होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या गावातील देखील दोन ग्रामपंचायत सदस्य ओबीसी असल्याचे आढळून आलेले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून माहिती गोळा करण्यापेक्षा प्रत्यक्षात गावात जाऊन पडताळणी करण्याची आवश्यकता होती. मात्र ते झाले नाही. आता हे प्रकरण न्यायालयात असून त्यातून सकारात्मक निर्णय येईल अशी आशा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकराने केलेल्या पेट्रोल डीझेल दरकपातीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना ते म्हणाले की, भाजपच्या केंद्रातील सरकारपेक्षा राज्यातील सरकार अधिक हुशार निघाले आहे. कारण एकीकडे राज्यसरकारने सर्व वस्तूंवरील जीएसटी ५ टक्क्यांनी वाढविला, वीज बिल वाढवलं, एलपीजी 50 तर सीएनजी 4 रुपयांनी महाग केलं आणि दुसरीकडे केवळ 5 रुपयांनी पेट्रोल आणि 3 रुपयांनी डीझेल कमी केले. म्हणजे हे सरकार किती हुशार आहे हे कळते असा चिमटा काढत एखाद्याचे सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायची अशी पेट्रोल व डिझेलची दरकपात असल्याची टीका त्यांनी केली. 

ते म्हणाले की, नगरपरिषद नगराध्यक्षपद व सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राज्यातील मुख्यमंत्री हे तर शिवसेना फुटीर  गटातून मुख्यमंत्री झाले आहे. ही मोठी गंमत असून तरी ठीक आहे असे सांगत मिश्कील टिपणी केली. ते म्हणाले की, गेली १७ वर्ष आपण नाशिकच पालकत्व निभावलं आहे. राज्यात सरकार स्थापन झाले असून अद्याप पालकमंत्री नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांसाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण आपले काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gotya Gitte: सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
वाल्मिक कराडचा राईट हँड, गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
MAHARERA : महारेराचा 1950 प्रकल्पांना दणका, बँक खाती गोठवली, 10773 पैकी 5324 प्रकल्पांचा सकारात्मक प्रतिसाद
महारेराच्या नोटीसकडे दुर्लक्ष करणं भोवलं, 1950 प्रकल्पांना स्थगिती देत दणका, बँक खाती गोठवली, कारण...
Mumbai Local Train: बदलापूर-खोपोली वाहतूक बंद, मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळापत्रकात नेमके काय बदल होणार?
Horoscope Today 10 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवारMajha  Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 Jan 2025 : 6.30 AM : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gotya Gitte: सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
वाल्मिक कराडचा राईट हँड, गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
MAHARERA : महारेराचा 1950 प्रकल्पांना दणका, बँक खाती गोठवली, 10773 पैकी 5324 प्रकल्पांचा सकारात्मक प्रतिसाद
महारेराच्या नोटीसकडे दुर्लक्ष करणं भोवलं, 1950 प्रकल्पांना स्थगिती देत दणका, बँक खाती गोठवली, कारण...
Mumbai Local Train: बदलापूर-खोपोली वाहतूक बंद, मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळापत्रकात नेमके काय बदल होणार?
Horoscope Today 10 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Torres Scam : टोरेसच्या ऑफिसमध्ये पहाटे घडामोडी, 'त्या' दोघींकडून बॅगेत पैसे भरुन पसार होण्याचं प्लॅनिंग, एका फोननं प्रदीपकुमार सतर्क अन् खेळ खल्लास
टोरेसच्या कार्यालयातून टीप मिळाली, प्रदीपकुमार सहकाऱ्यांसह दादरच्या ऑफिसमध्ये पोहोचला अन् घोटाळ्याचा भांडाफोड
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Mutual Fund SIP : शेअर बाजार अस्थिर असताना गुंतवणूकदारांनी म्युच्यूअल फंडावर विश्वास दाखवला, डिसेंबरमध्ये 26000 कोटींची गुंतवणूक
बाजार अस्थिर असताना देखील गुंतवणूकदार खंबीर, SIP वर विश्वास, डिसेंबरमध्ये 26 हजार कोटींची गुंतवणूक, आकडेवारी समोर
Embed widget