Kasara Accident : कसारा घाटात कार उलटून थेट नाल्यात, चालकाचा मृत्यू, छगन भुजबळही धावले मदतीला
Kasara Accident : मुंबई आग्रा महामार्गांवरील (Mumbai Agra Highway) कसारा घाटाच्या (Kasara Ghat) खाली कार चालकाचा वाहना वरील ताबा सुटल्याने अपघात (Accident) होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला.
Kasara Accident :मुंबई आग्रा महामार्गांवरील (Mumbai Agra Highway) कसारा घाटाच्या (Kasara Ghat) खाली एका तीव्र वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाचा वाहना वरील ताबा सुटल्याने अपघात होऊन या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा कसारा घाटात अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
नाशिकहून (Nashik) मुंबईकडे (Mumbai) जात असताना शुक्रवारी दुपारच्या सुमारास कसारा घाटाच्या खाली असलेल्या ओहळची वाडी या वळणावर हा अपघात झाला. यावेळी भरधाव वेगात जात असताना कारचालक संजय मोरे यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारने जागीच उलटून रस्त्यालगत असलेल्या नाल्यात पडली. या भीषण अपघातात कारचा चालक संजय मोरे हे जागीच ठार झाले.
दरम्यान या अपघताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वातडे, धर्मेंद्र ठाकूर, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप गीते यांनी घटनस्थळी धाव घेत मदतकार्य केले. कार मधील गभीर जखमी संजय मोरे हे कार मध्ये अडकलेले होते. त्यांना तात्काळ बाहेर काढून टोल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासून चालक संजय मोरे यांना मृत घोषित केले.
दरम्यान या प्रकरणी कसारा पोलीस (Kasara Police) पुढील तपास करीत आहेत. याच दरम्यान अपघात झाला तेव्हा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे मुंबईहून नाशिककडे जात होते. त्यांनी महामार्गांवरील गर्दी बघतली असता ताफा थांबवला. स्वतः गाडीतून उतरून त्यांनी अपघात ठिकाणची पाहणी केली व अपघात ग्रस्तांना मदत करीत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांना जवळ बोलवून माहिती घेतली. यावेळी त्यांनी तात्काळ मदतीसाठी येऊन तुम्ही मोलाची कामगिरी करत असल्याने सांगत कौतुकाची थाप मारत टीमचे आभार व्यक्त केले.
छगन भुजबळ धावले मदतीला
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज मुंबईहून नाशिककडे येत असतांना कसारा घाटात अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ अपघातस्थळी थांबून पाहणी केली. अपघाताची तीव्रता अधिक असल्यामुळे वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात मयत झालेल्या वाहनचालकाच्या नातेवाईकांसोबत तात्काळ त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या.
इतर बातम्या :
Nashik Swine Flu : नाशिकमध्ये कोरोनानंतर स्वाईन फ्ल्यूचे संकट! ऑगस्ट महिन्यात अकरा जणांचा मृत्यू
Nashik Crime : धूमस्टाईल पाठलाग! सुरगाण्यात पुष्पा पॅटर्न तस्करीचा डाव उधळला, दोघे संशयित ताब्यात
Nashik News : 'नो पार्किंग'मध्ये नसताना वाहन उचललंय, मग इथं संपर्क करा, नाशिक ग्राहक मंचचा मदत कक्ष