Nashik Grampanchayat Election : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सहा जागांवर 18 मे रोजी पोटनिवडणूक, अर्ज दाखल करण्यास सुरुवात
Nashik Grampanchayat Election : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यात बाजार समित्यांची रणधुमाळी सुरु असताना ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा (Grampanchayat Election) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 242 ग्रामपंचायतींमधील 350 रिक्त जागांसाठी व थेट सरपंचपदाच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. इच्छुकांना मंगळवारपासून अर्ज दाखल असून पूढील महिन्यातील 18 मे रोजी मतदान ग्रामपंचायत (Grampachayat Vote) निवडणुकांची मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
एकीकडे नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समिती (Bajar Samiti) निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून दुसरीकडे राज्याचे राजकारणही चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. काही महिन्यापूर्वीच नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या. अतिशय अटीतटीच्या लढती अनेक ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये पाहायला मिळाल्या. आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील 242 ग्रामपंचायतींमधील 350 रिक्त जागांसाठी व थेट सरपंचपदाच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 2 हजार 620 ग्रामपंचायतींमधील रोजी 3 हजार 666 रिक्त पदे तसेच 126 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
राज्यात महाविकास आघाडी (Mahavkas Aaghadi) पायउतार झाल्यानंतर पहिल्या टप्पातील 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केली. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातही सात हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुकां धुरळा उडाला. त्यानंतर आता पुन्हा जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून या ग्रामपंचायती जोरदार तयार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात तहसीलदारांनी तालुकास्तरावर निवडणुकांची आचारसंहिता घोषित केली. उमेदवारी अर्जासाठी 2 मे अंतिम मुदत असून या कालावधीत शासकीय सुट्टी वगळता अर्ज दाखल करता येईल. अर्जांची 3 मे रोजी छाननी होईल. 8 मे रोजी दुपारी तीनपर्यंत माघारीसाठी मुदत आहे. माघारीनंतर निवडणूक चिन्हाचे वाटप होईल. 18 मे रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होईल. 19 मे तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 24 मेपर्यत निकालाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
असा असणार निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरण्याची मुदत 25 एप्रिल ते 2 मे पर्यंत असणार
नामनिर्देशनपत्र छाननी 3 मे रोजी होणार
अर्ज मागे घेण्याची मुदत 8 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत असणार
निवडणूक चिन्ह वाटप 8 मे रोजी दुपारी 3 नंतर केले जाणार
गरजेनुसार 18 मे रोजी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.
19 मे रोजी मतमोजणी करून निकाल दिले जाणार आहेत.