Plastic Bann In Nashik :नाशिककर! खबरदार प्लॅस्टिक वापराल तर, आता होणार दंडात्मक कारवाई
Plastic Bann In Nashik : नाशिक महापालिका (Nashik) हद्दीत प्लास्टिकचा वापर (Plastic Bann) पूर्णपणे प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
Plastic Bann In Nashik : नाशिक महापालिका हद्दीत प्लास्टिकचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत संबंधित प्राधिकरण व अधिकाऱ्यांनी सर्वंकश कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. नाशिक महापालिका हद्दीत असे प्रतिबंधित प्लास्टिक कोणत्याही जाडीचे अथवा लांबीचे, त्याचा वापर विक्री साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नाशिक महापालिका हद्दीत सर्व प्रकारचा सिंगल वापर, प्लास्टिकचा वापर विक्री साठवणूक इत्यादी पूर्णपणे प्रतिबंधक करण्यासंदर्भात राज्य स्थरीय टास्क फाेर्स समितीची पहिली बैठक आज मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवन मुख्यालयात झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहारत सर्व प्रकारच्या प्लास्टिकचा एकल वापर, प्लास्टिक वापर विक्री, साठवणूक याबाबत कार्यवाही संदर्भात सद्यस्थितीचा आढावा घेतला. सदर बैठकीत उपस्थितांनी विविध विभागांकडे अधिकाऱ्यांनी सादर केलेले मुद्दे व सूचना याला अनुसरून तसेच महाराष्ट्र प्लास्टिक अँड नोटिफिकेशन 2018 नुसार शहरात प्लास्टिक बाबत पूर्णपणे प्रतिबंध करणे व त्या कामी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी आदेश दिले आहेत. शहरात सर्व प्रकारच्या एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित करण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा स्पष्ट करताना आयुक्त म्हणाले की कुठलाही एकल वापर प्लास्टिक कचऱ्यामुळे नागरिक घनकचरा हाताळणी यामध्ये विविध समस्या निर्माण होऊन त्यासाठी आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर लागतो.
तसेच अविघटनशील कचरा उघड्यावर वा कचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी जाळल्याने नागरिक, जनावरे यांच्यामध्ये शारीरिक व्याधी निर्माण होतात. यामुळे सार्वजनिक आरोग्यावर विपरीत व घातक परिणाम होतो. तसेच अनेकदा हा प्लास्टिक कचरा नदी नाल्यात अडकून पडल्याने घाणीचे साम्राज्य तयार होऊन पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्याचप्रमाणे जैवविविधतेवर परिणाम होण्याबरोबरच पर्यटन स्थळे शेती वनी व परिसंस्था इत्यादी ठिकाणी नैसर्गिक स्त्रोतापासून मिळणाऱ्या परिसंस्थांचा सेवावर अशा प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रतिकूल परिणाम होतो. स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंमलबजावणी व निकष वर देखील अशा प्लास्टिक वापर कचरा अडसर ठरतो.
नाशिककरांचे सहकार्य अपेक्षित
नाशिक शहरातील नागरिक, संस्था, कार्यालये, दुकाने, हॉटेल खानावळ, दूध विक्रेते, भाजी विक्रेते व अन्य सर्व प्रकारच्या कुठल्याही अस्थापना यांनी कुठल्याही प्रकारचा एकल वापर प्लास्टिकचा वापर करू नये, त्याची विक्री, साठवणूक करू नये, या बाबींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. आपल्या नाशिक शहराचे सार्वजनिक आरोग्य स्वच्छता सौंदर्य अबाधित राखण्यासाठी शहरवासीयांना नाशिक महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.
दंडात्मक कारवाई
नाशिक शहरातील दुकाने, आस्थापना, नागरिक इत्यादींनी प्लास्टिकचा वापर तसेच विक्री साठवणूक करता कामा नये. सदर बाबींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक करवीर करण्यात येणार आहे. यासाठी पहिला गुन्ह्यासाठी 5000 रुपये, दुसरा गुन्ह्यांसाठी 10 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यांसाठी 25 हजार रुपये व 03 महिने कारावाची शिक्षा असणार आहे.