(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Amit Thackeray : एक दोन माणसं सोडून गेल्याने काही फरक पडत नाही, नाशिकमध्ये अमित ठाकरे यांचं वक्तव्य
Nashik Amit Thackeray : राज साहेबांना मानणारा एवढा मोठा वर्ग आहे की एखादं दोन गेले तर काही फरक पडत नाही.
Nashik Amit Thackeray : राज साहेबांना (Raj Thackeray) मानणारा एवढा मोठा वर्ग आहे की एखादं दोन गेले तर काही फरक पडत नाही. मात्र जे पक्ष अशा एक दोन माणसाना घेऊन जात आहेत, एक एक माणसाला ओढून त्यांना काय मिळतंय मला माहित नाही, त्यामुळे अशा एक दोन माणसे गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही, असे वक्तव्य मनसेचे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केलं आहे.
मनसे (MNS) नेते अमित ठाकरे दोन दिवस ते नाशिक (Nashik) शहर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अमित ठाकरे नाशिक शहरातील शाखाध्यक्षांशी संवाद साधून आगामी काळातील डॅमेज कंट्रोलसाठी मोर्चेबांधणी करणार असल्याचे समजते. त्यामुळे नाशिकमध्ये चांगलीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळत असून आता मनसेने देखील इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी थेट अमित ठाकरे हे नाशिकमध्ये आहेत. नाशिकच्या ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अशातच मागील प्रवेशावेळी मनसेचे पदाधिकारी असलेल्या सचिन भोसले यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांना गळती लागू नये यासाठी ठाकरेंकडून संवाद साधला जात आहे.
अमित ठाकरे यावेळी म्हणाले, यावेळी नाशिकला विद्यार्थी सेनेच्या नियुक्त्यांसाठी आलो आहे. तसं ही नाशिकला यायला आवडत. मात्र अनेकदा नाशिकला येण्यासाठी कारणंच शोधत असतो. सगळ्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवण्या ऐवजी मीच नाशिकला आलो. नाशिकमध्ये उत्साह असतोच. मी मागच्या दौऱ्यात सगळीकडे फिरलो, सगळ्यांना विद्यार्थी सेनेते काम करण्याची इच्छा आहे. निवडणूक लागणार कधी ते मला सांगा, मग आपण त्या बद्दल बोलू असे ठाकरे म्हणाले. मी एप्रिल ऐकतोय, सप्टेंबर ऐकतोय..तुम्हाला कळाल की मला सांगा मग आव त्यावर बोलू आता निवडणुकीची तयारी वगैरे नाही, तर पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशावर ते म्हणाले कि, पक्षात लोक येत जात असतात. आमच्याकडे भाजपाच्या 150 जणांनी मुंबईत प्रवेश केला असून राजकारणात हे होत असत. लोक जात असले तरी आमच्याकडे रिप्लेसमेंट रेडी आहे. राज साहेबांना मानणारा एवढा मोठा वर्ग आहे की एखादं दोन गेले तर काही फरक पडत नाही. एक एक माणसाला ओढून त्यांना काय मिळतंय मला माहित नाही, मात्र अशा पक्ष प्रवेशाचा आम्हाला त्याचा फरक पडत नाही. आगामी कामकाजासाठी जानेवारीत परत येणारया असून आता नाशिकची टीम तयार झाली आहे. त्याचबरोबर नाशिकमधील कॉलेज लेव्हलला युनीट स्थापन करायचे असल्याने त्याच्या तयारीला लागणार आहे. चांगले संबंध असतानाही आपल्याकडे देखील लोक येत आहेत ना? त्यामुळे मनसेची पहिली फेज नक्की परत येणार असा विश्वास डेझीम अमित ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.