एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Saptshrungi Gad : सप्तशृंगी देवी मंदिर अवघे एक किलोमीटरवर, तत्पूर्वीच भाविकांचे वाहन उलटलं! 

Nashik Saptshrungi Gad : मालेगाव - दाभाडीचे भाविक पिकअप व्हॅनमध्ये सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला निघाले होते.

Nashik Saptshrungi Gad : सप्तश्रृंगी गडावर (Saptshurngi Gad) दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात (Accident) झाला असून 20 हुन अधिक प्रवासी जखमी झाल्याचे समजते आहे. मालेगाव - दाभाडीचे भाविक पिकअप व्हॅनमध्ये बसून दर्शनासाठी जात असताना अचानक सपाटीवर असताना वाहन उलटून अपघात झाल्याची घटना घडली. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सध्या सुट्ट्यांचा आठवडा असल्याने अनेक भाविक भक्त सप्तशृंग गडावर दर्शनासाठी येत आहेत. अशातच नाशिकच्या (Nashik) मालेगाव तालुक्यातील (Malegaon) दाभाडी येथून काही भाविक भक्त सप्तशृंगी देवीच्या (Saptshurngi devi) दर्शनाला निघाले होते. पन्नास साठ किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर सप्तशृंगी गड अवघा एक किलोमीटरवर असताना अचानक पिकअप वाहन उलटले. यावेळी वाहनात भाविकांची गर्दी असल्याने एकमेकांवर आदळले. यामुळे अनेकजण जखमी झाले. दरम्यान भाविकांनी आरडाओरड करून स्थानिक नागरिक, सप्तशृंगी देवी प्रशासनास तात्काळ बोलवले. त्यांनतर जखमींना वणी रुग्णालयात हलविण्यात आले. 

आज सकाळी मालेगाव दाभाडी (Dabhadi) येथील बंडु गांगुर्डे यांच्या पिकअपमधून सदर भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. त्यावेळी सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन प्रवासी जखमी झाले. तर चौघांवर नांदुरी येथे तर उर्वरीत जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. नांदुरी ते सप्तशृंगगड हे अंतर दहा किलोमीटर असुन सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पिकअप उलटल्याने भाविकांनी आक्रोश केला. गडावरील नागरीक, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले. 

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी
नाशिकच्या वणी गडावर भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून या अपघातांत 20 हुन अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अपघातात जखमी असलेले सगळे भाविक मालेगावच्या दाभाडी मधील आहे. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडीने उलटली आणि हा अपघात झाला. सर्व भाविक पिकप या मालवाहतूक करणाऱ्या गाडीने दर्शनाला चालले होते. सप्तशृंगी चे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट उलटले. भाविकांनी आक्रोश केल्यानंतर गडावरील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घटनास्थळावरून हलवलं. वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान चढ चढून सपाटीला लागलो, मात्र अचानक पणे गाडी उलटली, आम्ही सर्व एकेमकांवर आदळलो, नेमकी गाडी कशी काय उलटली हेच समजायला मार्ग नसल्याचे पिकअप चालकाने सांगितले. दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याने अपघात घडल्याची चर्चा आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange On Protest : पुढील उपोषण मुंंबईत आझाद मैदानावर करण्याचा विचार -जरांगेSreejaya Chavan On EVM : ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन श्रीजया चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा #abpमाझाSanjay Raut VS Raosaheb Danve : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, दानवेंची राऊतांवर टीका #abpमाझाSanjay Raut VS Bawankule : शपथविधीचे अधिकार बावनकुळेंना दिलेत का? राऊतांचा बावनकुळेंना सवाल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Embed widget