एक्स्प्लोर

Nashik Gram panchayat : मतदारांच्या लांबच लांब रांगा, नाशिक जिल्हयात दुपारपर्यंत 68.61 टक्के मतदान

Nashik Gram panchayat : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील ग्रामपंचायत मतदानासाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला.

Nashik Gram panchayat : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे (Gram Panchayat) मतदान सुरु आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्याचे नेतृत्व करणाऱ्या दिग्ग्ज नेत्यांनी या निवडणुकीत ताकद पणाला लावल्याने या निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत. दरम्यान ग्रामपंचायत मतदानासाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला असून दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 68.61टक्के मतदान झाले आहे. 

नाशिक जिल्ह्यात सुरगाणा (Surgana) वगळता 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. यातील 08 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 188 ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे, गिरणारे, एकलहरे या ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती आहेत. दरम्यान जिल्ह्यात दुपार दीड वाजेपर्यत सरासरी 58 टक्के मतदान झाले. तर दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 68.61 टक्के मतदानाची आकडेवारी आली आहे. अनेक मतदान केंद्रांवर त्यामुळे मोठ्या रांगा दिसून आल्या. 

दरम्यान आतापर्यंत 68 टक्के मतदान झाले असून यामध्ये 1 लाख 36 हजार 714 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर पुरुष मतदारांमध्ये 1 लाख 50 हजार 648 मतदानाचा हक्क बजावला आहे.  नाशिक जिल्ह्यात 2 लाख 87 हजार 362 अशा एकूण मतदारांनी मतदान केले आहे. बहुतांशी मतदार स्वतः हून मतदान केंद्रावर हजर झाले होते. मतदान शांततेत सुरु असून आतापर्यत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदानानंतर सर्वच उमेदवारांचे भवितव्य या मतदानपेटीत बंद होणार असून 20  डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 

नाशिक जिल्ह्यात 196 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक
नाशिक जिल्ह्यात एकूण 196 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये 07 ग्रामपंचायत बिनविरोध ग्रामपंचायती आहेत. तर 19 बिनविरोध सरपंच, 579 बिनविरोध सदस्य आहे. दरम्यान 1291 जागांवर मतदान होणार आहे. यातील 177 सरपंचासाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी जिल्ह्यात 745 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण सदस्य पदासाठी 2897 तर सरपंच पदासाठी 577 उमेदवार रिंगणात आहेत.

बिनविरोध ठरलेल्या 8 ग्रामपंचायती 
बागलाण तालुका - किकवारी बु, ढोलबारे, महड.. नाशिक तालुका - कोटमगाव.. चांदवड तालुका - नारायणगाव.. कळवण तालुका - जयपूर.. नांदगाव तालुका - शास्त्रीनगर, दिंडोरी - जालखेड . पालकमंत्री दादा भुसेंचे मालेगाव, आमदार छगन भुजबळांचा मतदार संघ येवला, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंच्या नांदगाव मध्ये निवडणुका लागल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या खासदार असलेल्या दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघातील 7 तालुक्यात निवडणुका होत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget