Shravani Somwar : चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी, ब्रम्हगिरी फेरीलाही रीघ
Shravani Somwar : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त (Shravani Somwar) प्रचंड गर्दी असून देशभरातून भाविक दाखल झाले आहेत.
Shravani Somwar : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त (Shravani Somwar) प्रचंड गर्दी असून देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरात दाखल झाले आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Trimbakeshwer Jyotirling) दर्शनासह लाखो भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीसाठी (Bramhgiri) हजेरी लावली आहे. त्यामुळे शहर परिसरात भाविकांसह पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे.
कोरोना (Corona) चे निर्बंध शिथिल झाल्याने यंदा श्रावण सोमवार सुरु झाल्यापासून त्र्यंबकेश्वर शहरात भाविकांची वर्दळ सुरु होती. त्याच यंदा पहिल्या सोमवारपासून त्र्यंबकेश्वर शहरात भाविकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या सोमवारी गर्दीचा उच्चांक पाहायला मिळत होता. तर आज चौथ्या सोमवारी देखील अनेक भाविकांनी त्र्यंबकेश्वरी हजेरी लावली आहे. मोठ्या प्रमाणावर भाविक त्र्यंबकेश्वरला दाखल होत असल्याने नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिकही पाहायला मिळत आहे.
दरम्यान चौथ्या सोमवारसाठी काल सायंकाळपासूनच भाविक दाखल होत होते. त्यातच आज सकाळपासून त्र्यंबकेश्वर दर्शनासह ब्रम्हगिरी फेरीसाठी भाविकांची रीघ लागली आहे. श्रावण सोमवारानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. देशभरातून भाविक त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी येत आहेत. विशेष म्हणजे ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा देखील लाखो भाविक करत असतात. त्यामुळे भाविकांना नाशिक ते त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी परिवहन महामंडळाकडून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
हजारो भाविकांची उपस्थिती
नाशिकहुन त्र्यंबकेश्वरसाठी महामंडळाच्या बसेस धावत आहेत. तसेच भाविकांना खासगी वाहनांचा अडथळा येऊ नये, यासाठी खंबाळे येथे खासगी वाहनाची पार्किंग व्यवस्था आहे. दरम्यान रविवार सायंकाळ पासूनच त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनाची रीघ लागल्याचे दिसून आले. आज त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग आणि फेरीसाठी हजारो भाविक त्र्यंबकेश्वरात दाखल असून दिवसभर प्रचंड गर्दी होती. तसेच चौथ्या सोमवारी नाशिक शहर परिसर आणि त्र्यंबक तालुक्यातील अनेक भाविक दर्शनासाठी दाखल होतात. कारण तिसऱ्या सोमवारी राज्यभरातून भाविक दाखल होत असल्याने प्रचंड गर्दी असते. ही गर्दी टाळण्यासाठी स्थानिक भाविक चौथ्या सोमवारी फेरीसाठी प्राधान्य देतात.
ब्रम्हगिरी फेरीला वाढता प्रतिसाद
तिसऱ्या श्रावणी सोमवारी लाखो शिवभक्त ब्रम्हगिरी प्रदक्षिणा घालतात. रविवारी रात्री या फेरीला सुरुवात होते. त्यामुळे रविवारी सायंकाळपासूनच शहर परिसरात भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. शिवाय दोन वर्षे बंद असलेल्या फेरीमुळे यंदा गर्दी वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. फेरीमार्गावर वैद्यकीय पथके तैनात असून खंबाळे, तळवाडे येथे पार्किंग व्यवस्था असून खासगी वाहनांना त्र्यंबकमध्ये प्रवेशबंदी आहे.