Nashik Grapes: दोन वर्षांनंतर द्राक्ष उत्पादकांना सोन्याचे दिवस, दिड लाख टन द्राक्ष निर्यातीचं ध्येय
Nashik Grapes: महाराष्ट्राचा देशामध्ये द्राक्ष उत्पादनात प्रथम क्रमांक असून नाशिकची ओळख तर द्राक्षपंढरी म्हणून आहे.
![Nashik Grapes: दोन वर्षांनंतर द्राक्ष उत्पादकांना सोन्याचे दिवस, दिड लाख टन द्राक्ष निर्यातीचं ध्येय maharashtra news nashik grapes will be exported in huge quantity to europe Nashik Grapes: दोन वर्षांनंतर द्राक्ष उत्पादकांना सोन्याचे दिवस, दिड लाख टन द्राक्ष निर्यातीचं ध्येय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/13f5eb17f5d77a4197916b483eb14f7c1673370846532265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Grapes: गेली दोन वर्ष द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण होती मात्र यंदा नववर्षाची सुरुवातच द्राक्ष त्यांच्यासाठी चांगली झाली, असून गेल्या दहा दिवसात नाशिक जिल्ह्यातून 197 मेट्रिक टन द्राक्षाची एकट्या युरोप खंडात निर्यात झाली आहे. तर इतरही देशात द्राक्ष जाऊन पोहोचली आहेत.
महाराष्ट्राचा देशामध्ये द्राक्ष उत्पादनात प्रथम क्रमांक असून नाशिकची ओळख तर द्राक्षपंढरी म्हणून आहे. जिल्ह्यात ६२ हजार ९८२ हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जाते त्यात निफाड, दिंडोरी, नाशिक आणि निफाड हे तालुके द्राक्ष घेण्यात अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे राज्यातील ९१ टक्के द्राक्ष निर्यात ही एकट्या नाशिक जिल्ह्यातून होत असून यंदा तर नवववर्षाच्या सुरुवातीलाच एकट्या युरोप खंडात गेल्या दहाच दिवसात नाशिक जिल्ह्यातून १९७ मेट्रिक टन द्राक्ष जाऊन पोहोचल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जातय. ०१ नोव्हेबर २०२२ ते ०८ जानेवारी २०२३ पर्यंत जिल्ह्यातून २८९.८५ मेट्रिक टन द्राक्षांची युरोप खंडात तर १०२७ मेट्रिक टन द्राक्षांची युरोप वगळता ईतर देशात निर्यात झाली आहे. युरोप खंडात नेदरलँड, जर्मनी, बेल्जीयम, युके आणि डेन्मार्क हे द्राक्षांची आयात करणारे मुख्य देश आहेत तर युरोप वगळता ईतर खंडांचा विचार केला तर रशिया, युएई, कॅनडा, तर्की आणि चीन या देशातून द्राक्षांना मोठी मागणी होत असते.
नाशिकमधून कोणत्या साली किती निर्यात ?
२०१८-१९ - १ लाख ४६ हजार ११३
२०१९-२० - १ लाख १६ हजार ७६७
२०२०-२१ - १ लाख २६ हजार ९१२
२०२१-२२ - १ लाख ७ हजार ४८४
मागील दोन वर्षे आधी कोरोना आणि त्यानंतर रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका द्राक्ष निर्यातीला बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता मात्र यंदा वर्षाची सुरुवात चांगली झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. १५ फेब्रुवारी नंतर निर्यातीचा खरा काळ सुरु होणार असून द्राक्षाला योग्य दर मिळावा, यात घसरण होऊ नये अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत.
कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ (या वर्षी निर्यातीची सुरुवात चांगली आहे. गेल्या वर्षी ५ जानेवारी पर्यंत निर्यात शून्य होती, रशियालाही यंदा हळूहळू सुरुवात झालीय जी गेल्या वर्षी युद्धमुळे थंड होती. द्राक्ष बागांना सूर्यप्रकाश चांगला मिळाला, दरही चांगला मिळालाय. वातावरण खराब होऊ नये, दरही असेच रहावे. चीनमध्ये आता कोरोनामुळे काय होते ते बघावे लागले. कोरोनाचा आम्हाला मोठा फटका बसला होता. खूप तोट्यात शेतकरी गेला, उत्पदान खर्च वाढत चालला. आता भाव मिळाला तर तो शेतकऱ्यांसाठी बॅकलॉग म्हणावा लागेल. १५ फेब्रुवारी नंतर आवक वाढल्याने दर कोसळतील, पण ते नियंत्रणात रहावे.)
नाशिक जिल्ह्यातील हवामान द्राक्षबागांसाठी अनुकूल असून या वर्षी निर्यातीचे देखिल रेकॉर्ड ब्रेक होईल आणि सव्वा लाखाहून अधिक मेट्रिक टन द्राक्ष सातासमुद्रापार जाऊन पोहोचतील अशी आशा आहे. फक्त आता निसर्गाने साथ द्यावी आणि कोरोनासारखे कोणते नवे संकट पुन्हा ओढावू नये अशीच प्रार्थना शेतकरी करतायत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)